1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

स्पोर्ट्स फोटोग्राफी

इंद्रनील मुखर्जी
आंतरराष्ट्रीय दर्जाचे फोटोग्राफर असलेले इंद्रनील मुखर्जी हे सुप्रसिद्ध स्पोर्ट्स फोटोग्राफर आहेत. त्यांनी ऑलिम्पिक सारख्या मोठ्या खेळांच्या स्पर्धासाठी अनेकवेळा प्रकाशचित्रण केले आहे.


अनुवाद - स्वप्नाली मठकर


स्पोर्ट्स फोटोग्राफी इंद्रनील मुखर्जी, मुंबई

२ एप्रिल, २०११, गर्दीने खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियमवरचे रसिकच फक्त नाही, तर भारतातल्या घराघरात बसलेले क्रिकेटवेडे रसिकही टिव्हीपुढे खुर्चीला खिळून बसले होते. भारताने ती मॅच जिंकावी म्हणून मनोमन प्रार्थना करत होते. तितक्यात कॅप्टन-कूल धोनीने बॉलला तडीपार केले. सगळे रसिक आनंदोत्सव साजरा करत असताना मी मात्र एक परफेक्ट फोटो घेण्याची धडपड करत होतो. मलाही सगळ्यांबरोबर आनंदाने नाचावसं वाटते होतं, पण त्यावेळी मी माझ्या ५००मिमी लेन्स मधून धोनीकडे लक्ष ठेवून विजयाचा फोटो काढत होतो. आणि मला हवा होता तो नेमका फोटो मिळाला. हातात बॅट तशीच धरून तडीपार जाण्याऱ्या बॉलवर खिळलेली धोनीची तीक्ष्ण नजर, आणि आनंदाने उडी मारत असलेला युवराज सिंग! हा फोटो माझा सगळ्यात आवडता, कारण यात क्रिकेटमधील एक महत्वाचा क्षण नोंदला गेलेला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने 'द आयसीसी हिस्टरी ऑफ क्रिकेट' या त्यांच्या पहिल्या क्रिकेटविषयक संकलनात हा फोटो मुखपृष्ठ म्हणून वापरला आहे.

बहुतेक ठिकाणी व्यावसायिक स्पोर्ट्स फोटोग्राफी हा फोटो-जर्नालिझमचा एक विशेष भाग म्हणून ओळखला जातो. तर हौशी खेळाडू किंवा लहान मुलाच्या खेळांचे फोटो काढणे हे स्थानिक फोटोग्राफरचे काम असते. व्यावसायिक स्पोर्ट्स फोटोग्राफीचा वापर बातम्यांमध्ये होतो. पूर्णवेळ स्पोर्ट्स फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर मासिके, मोठी वृत्तपत्रे, स्पोर्ट्स मासिके यासाठी काम करतात. आजकाल मात्र स्पोर्ट्स फोटोग्राफी ही जाहिरातक्षेत्रातही मुख्यत्वे ब्रॅण्डसाठी आणि खेळाचा प्रसार करण्यासाठीही वापरली जाते.

चांगला प्रकाशचित्रकार हा तंत्रज्ञ आणि कलाकार दोन्ही असावा लागतो. तांत्रिक ज्ञान आणि कलाकाराची दृष्टी एकत्र आणून तो स्वत:ची अशी वेगळी निर्मिती करतो. चांगला फोटो हा चांगले कम्पोझिशन, एक्स्पोझर, चांगला लाईट, साधा आणि नेमका क्षण टिपलेला असा असतो. पिलर्स, अंपायर्स, स्टँड मधले लोक, इतर लक्षवेधक गोष्टी आणि


स्पोर्ट्स फोटोग्राफी इंद्रनील मुखर्जी, मुंबई

सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांचे, खेळाडूंचे हावभाव किंवा वेगळेपण टिपणारा नेमका क्षण या गोष्टी फोटोला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात.

अॅक्शन आणि हावभाव हे स्पोर्ट्स फोटोग्राफीचे महत्वाचे अंग. त्याशिवाय नशिबाचा भाग आहेच. दिवसभर ग्राऊण्डजवळ बसूनही एखादवेळेस एखादा फोटो हुकतो आणि नेमका तोच क्षण त्या खेळातला महत्त्वाचा क्षण ठरतो. कधीकधी सहनशक्तीची परीक्षाच घेतली जाते असे म्हणायला हरकत नाही. आणि दिवसाच्या शेवटी ज्या फोटोग्राफरकडे सगळ्यात वेगळा असा फोटो असतो, तो त्या दिवसाचा राजा!

खेळाप्रमाणे स्पोर्ट्स फोटोग्राफीमधेही भरपूर मेहनत घ्यावी लागते, घाम गाळत दिवसभर बसावे लागते. सहनशक्तीने आणि जिद्दीने काम करावे लागते. या प्रकारच्या प्रकाशचित्रणासाठी मानसिक आणि शारिरिक तयारी असणेही आवश्यक आहे. दिवसभर तळपत्या उन्हात, कधी गोठवणाऱ्या थंडीत, कधी पावसात खाणेपिणे विसरून बसावे लागते. योग्य फोटो टिपण्यासाठी सजग रहावे लागते. मोठमोठ्या लेन्सेस, कॅमेरे उचलून न्यावे लागतात. ऑलिम्पिकसारख्या मोठ्या कार्यक्रमात तर दिवसाचे अठरा ते वीस तासही काम करावे लागते. इथे कामाचे नियोजन, अभ्यास यांना खूपच महत्व आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ फोटोग्राफरकडून शिकणे, मैदानात असताना मिळालेले सल्ले ऐकून त्यावरून शिकणे हे ही तितकेच आवश्यक आहे.

मी गेली पंधरा वर्षं स्पोर्ट्स फोटोग्राफी करत आहे. याकाळात बीजिंग-२००८ , लंडन-२०१२ अशी दोन ऑलिम्पिक्स, आयसीसी टी२० क्रिकेट वर्ल्डकप-२०१०, कॉमनवेल्थ गेम्स, दिल्ली-२०१०, क्रिकेट वर्ल्डकप-२०११ अशा मोठ्या खेळाच्या कार्यक्रमांसाठी प्रकाशचित्रण केले आहे. तरीही जेष्ठ प्रकाशचित्रकारांबरोबर गप्पा मारून नवनवीन गोष्टी शिकायला मला नेहेमीच आवडतं. आपल्या चुका जाणून घेऊन त्या सुधारणे, नवीन गोष्टी शिकणे हे दोन्ही आवश्यक आहे.


स्पोर्ट्स फोटोग्राफी इंद्रनील मुखर्जी, मुंबई

लंडन ऑलिम्पिक्स मधला एक किस्सा इथे लिहितो. मी तिथे हॉकीची मॅच कव्हर करत होतो. या उद्घाटनाच्या सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी अतिशय देखणी असणार होती. आमचे ज्येष्ठ फोटोग्राफर बाकी फोटोग्राफर्सच्या कामाचे आणि जागांचे नियोजन करत होते. अशा मोठ्या खेळांत बरेच फोटोग्राफर असतात. यावेळी सुमारे पन्नासजण होते. त्यांनी मला स्टेडियमच्या वरून दिसणार्याळ दृश्याबद्दल विचारले. त्यावेळी मी त्यांना त्या जागेवरून वेगवेगळ्या लेन्सने कसे फोटो येतील ते दाखवले. ही जागा खरंतर दुसऱ्या फोटोग्राफरला देण्यात आली होती. पण मी आधीच हे ग्राऊण्डवर्क केल्याने ही वरची जागा त्यांनी मलाच असाईन केली. (देऊ केली.) फटाके सुमारे नऊ वाजता फोडले जाणार होते. पण आम्हाला चार वाजल्यापासूनच जागेवर बसायचे होते. वर कमालीची थंडी आणि बोचरा वाराही होता. त्यात माझ्याकडे तीन कॅमेरे! बराच वेळ थंडीत बसल्यावर अचानक हलका पाऊस पडायला लागला. आता कॅमेरा, लॅपटॉप इत्यादी सांभाळत पोंचोमध्ये बसणे फारच त्रासाचे झाले. नशिबाने थोडा वेळात पाऊस थांबला आणि वेळेत फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी झाली.


स्पोर्ट्स फोटोग्राफीसाठी काही टिप्स -

१. कमी प्रकाशातले चित्रण -
कमी प्रकाशात चित्रण करताना किंवा फ़ास्ट शटरस्पीडवर काम करताना नेहमीच आयएसओ जास्त असावा लागतो. आयएसओ वाढवला, की कॅमेरा कमी प्रकाशातही चांगले फोटो काढू शकतो. निकॉन डी७००, कॅनन ५डी मार्क २, किंवा इतर नवीन हायएण्ड कॅमेरे असतील, तर आयएसओ ३२००पर्यंत वाढवूनही चांगले फोटो काढता येतात.


स्पोर्ट्स फोटोग्राफी इंद्रनील मुखर्जी, मुंबई

२. आजूबाजूचे भागही चित्रात आणा
गर्दीने खचाखच भरलेले स्टेडियम असो वा अगदी रिकामे असो, चाहत्यांनी लावलेल्या मोठमोठ्या रांगा असोत, वा इतर आजूबाजूच्या गोष्टी असोत, तुमच्या फोटोत त्या दिसल्या पाहिजेत. या गोष्टींमुळे खेळाला, फोटोंना वेगळी रंगत येते. स्टेडियमच्या बाहेरची दुकाने, तिथले आजूबाजूचे भाग हे ही खेळाच्या चाहत्यांचा मूड उत्तमरित्या दाखवतात. वाईड लेन्स असेल, तर सगळ्या स्टेडियमचा किंवा त्या परिसराचा फोटो नक्की घ्यावा.

३. नेहेमीपेक्षा वेगळे काहीतरी
नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी चित्रित करायचा प्रयत्न करा. प्रत्येक नव्या खेळाला मी किती वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढता येतील याचा विचार करून ठेवतो. असे वेगळे काही करायला प्रत्येकवेळी प्रोफेशनल फोटो असाईनमेण्ट असायला पाहिजे असे काही नाही. माझा एक मित्र नेहमी म्हणायचा "जे काही तुम्ही प्रकाशचित्रित कराल, जिथे कुठे चित्रित कराल ते सगळेच युनिक असायला हवे." कधी कधी सगळ्यांबरोबर थांबून चित्रण करावे लागतेच, पण त्यातही तुमचे वेगळेपण दिसून आले पाहिजे.

४. कॅमेरा सामान वाहून नेण्यासाठी बॅग किंवा बेल्ट -
स्पोर्ट्स फोटोग्राफरना मोठमोठे कॅमेरे, लेन्सेस फिल्डवर घेऊन जाव्या लागतात. ते सगळे सामान वागवण्यासाठी चांगली बॅग, फोटोग्राफी व्हेस्ट किंवा सामान लटकवून ठेवायचे बेल्ट ही साधने आवश्यक असतात. आपले सगळे सामान योग्य रीतीने राहिल आणि वागवायला सोपं जाईल अशी बॅग किंवा बेल्ट घेणे आवश्यक आहे.

५. मोठ्या टेली लेन्सेस -
स्पोर्ट्स मध्ये अॅरक्शन चित्रित करायला टेली लेन्स ही अतिशय आवश्यक आहे. या लेन्समुळे तुम्ही मैदानाच्या कुठल्याही भागातून चित्रण करू शकता. आजकाल कॅमेरे खूप


स्पोर्ट्स फोटोग्राफी इंद्रनील मुखर्जी, मुंबई

जास्त आयएसओलासुद्धा चांगले फोटो देऊ शकतात. त्यामुळे फ/४ सारखी स्लो लेन्ससुद्धा चालू शकते. लेन्स खरेदी करताना ज्या लेन्स इतरांनी वापरून त्याचे चांगले रिपोर्ट दिले आहेत, अशाच लेन्स घ्या. त्यामुळेच कॅनन, निकॉनसारख्या मोठ्या कंपन्या त्यांचे चांगल्या लेन्सचे कलेक्शन सहसा बदलत नाहीत. व्यवस्थित काळजी घेतली, तर चांगली लेन्स दहा वर्षं सुद्धा वापरता येते.

६. मध्ये मध्ये फोटो बघू नका.
बहुतेक फोटोग्राफर फोटो काढून झाला, की लगेचच पाठच्या स्क्रीनमध्ये बघतात. ते स्पोर्ट्स फोटोग्राफी करताना अजिबात करू नका. कारण त्यामुळे खेळावरचे तुमचे लक्ष विचलित होते आणि एखादा महत्त्वाचा भाग हुकला जाऊ शकतो. (नजरेतून सुटतो.) सारखे स्क्रीन चालू करून बॅटरी संपते. शिवाय खेळाकडे दुर्लक्ष झाल्याने इजा होण्याची शक्यता वाढते. जेव्हा खरंच वेळ असेल, तेव्हा फोटो बघणे ठीक आहे, पण खेळ चालू असताना नक्कीच नाही.

७ खेळाबद्दल माहिती करून घ्या
खेळ, त्याचे नियम माहिती असतील, खेळाडूंच्या सवयी, खेळण्याच्या पद्धती माहिती असतील, तर पुढे काय होणार याचा अंदाज येऊ शकतो. फोटोसाठी चांगली पोझिशन घेता येऊ शकते. एक मात्र नक्की, की कितीही तयारी केलीत, तरी अनपेक्षित काहीतरी घडण्याची मनाची तयारी नक्कीच करून ठेवा. आपण ठरवल्याप्रमाणे काही झाले नाही, तर काय होईल याचाही विचार करून ठेवावा.

आता पुढच्या वेळेस एखाद्या खेळाडूचा अॅ्क्शनमध्ये असलेला फोटो पाहिलात, की तो फक्त हारजीतीच्या क्षणाचा फोटो नाही हे लक्षात असू द्या. नेमका क्षण साधत असा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरची कला, मेहेनत, अनेक महिन्यांचे ट्रेनिंग, सहनशक्ती आणि कौशल्य हे सुद्धा त्या फोटोमध्ये आहे याची आठवण नक्की ठेवा.


स्पोर्ट्स फोटोग्राफी इंद्रनील मुखर्जी, मुंबई


स्पोर्ट्स फोटोग्राफी इंद्रनील मुखर्जी, मुंबईमागील लेख पुढील लेख