1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

पक्षी निरीक्षण

नील नाईक
कला शाखेत प्रथम वर्षात शिकत असून पक्षी निरीक्षण, छायाचित्रण आणि गिर्यारोहणाची आवड येऊर, संजय गांधी नॅशनल पार्क, ताडोबा, जिम कॉर्बेट पार्क अशा विविध ठिकाणांना त्यासाठी भेटी देऊन पक्षी निरीक्षण व छायाचित्रण करण्याचा अनुभव.


पक्षी निरीक्षण नील नाईक, ठाणे

पक्षी निरीक्षण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते घनदाट जंगल आणि त्यात फिरणारी रानवेडी माणसं. मला देखील आधी असंच वाटायचं पण जेव्हा मी स्वतः पक्षीनिरीक्षण सुरु केले तेव्हा मला उमगलं की पक्षीनिरीक्षण म्हणजे केवळ जंगलात फिरणे नव्हे. खरंतर पक्षी निरीक्षण म्हणजे एखाद्या ठिकाणचे संपूर्ण निरीक्षण करणे. आपल्या आसपास अनेक प्रकारची झाडं आढळतात आणि झाडं म्हंटली की पक्षी आलेच. थोड निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की या कॉंक्रीट च्या जंगलात देखील अनेक पक्षी दिसतात.

पक्षी निरीक्षण हा एक रोमांचक अनुभव असला तरी हा अनुभव घेताना आपला संयम आपसूकच वाढत जातो. एखादा पक्षी बघण्यासाठी सलग ५/६ तास निःशब्द वाट पहावी लागते.त्याच्या इच्छेनुसार त्याने दर्शन देईपर्यंतचा काळ संयमाची परिसीमा गाठणारा असतो. मात्र त्या जेव्हा त्या पक्ष्याचा दर्शन घडतं तेव्हा आलेला थकवा एखाद्या पाखरासारखाच भरकन उडून जातो. पक्षीनिरीक्षण हे एक वेड आहे! एकदा हे वेड लागलं की मग सतत, आसपास शोधक नजरेने त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु असतो. जेव्हा पक्ष्याची एक झलक दिसते तेव्हा त्याला संपूर्ण पाहण्याची उत्सुकता वाढते. तो संपूर्ण दिसला की मग त्याची हालचाल आणि सवयी यांचा निरीक्षण करण्याची ओढ लागते! या शोधतच आपण गुंतत जातो आणि हा शोधच एक ध्येय बनून जातं!

मी पक्षी निरीक्षणास सुरवात केली ती माझ्या घरापासूनच. मी त्या वेळी माझ्या घराच्या खिडकीतून दिसणाऱ्या, तुटलेल्या झाडाच्या फांदीला दोन मोठी भोकं पाडून त्यात घरट बनवलेल्या तांबट (copper smith barbet) पक्ष्याचे निरीक्षण करायचो. त्याच्या घरट्याच्या एका भोकातून नुसता एक लाल ठिपका दिसायचा, त्यामुळे ते बघायला मजा यायची. नंतर मग त्याला पूर्ण बघितले. मग तो मादी समोर कसा प्रदर्शन करतो त्याचे


पक्षी निरीक्षण नील नाईक, ठाणे

निरीक्षण केले, काही दिवसांनी त्या दोघांचे मिलन देखील बघितले. पक्षीजगत इतकं सुंदर असतं हे पहिल्या नंतर मग मी घराबाहेर पाडून अजून नवनवीन पक्ष्यांचा शोध घेत निघालो.

एके दिवशी सकाळी मी कॉलेजला जायची तयारी करत होतो तेव्हढ्यात बाबांनी फक्त हात दाखवून मला खिडकीपाशी बोलावून घेतले आणि समोरच्या झाडाकडे बोट दाखवले, बाबा कुठे बोट दाखवतायत हे समजायला मला बिलकुल वेळ लागला नाही कारण अगदी समोर पिवळा धम्मक हळद्या बसलेला होता. या आधी पिवळा धम्मक हा रंग केवळ पुस्तकातच वाचला होतं परंतु त्या वेळी त्याची अनुभूती घेतली! आज मी माझ्या घरासमोरच्या काही झाडांवर १० पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद केलेली आहे. त्यापैकी काही पक्षी म्हणजे पहाडी पोपट, खंड्या, तांबट, हळद्या, शिंपी, सनबर्डस इत्यादी.

असे सगळे वेगवेगळे आणि रोमांचक अनुभव घेत असताना ते सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्यासाठी मी या पक्ष्यांच्या छायाचित्रणाला सुरवात केली. समान आवड असणाऱ्या मित्रांचा शोध सुरु झाला आणि सार्थक आव्हाड, मयुरेश हेंद्रे आणि प्रतिक कुलकर्णी सारखे मित्र जडले. मग आम्ही पक्षीनिरीक्षणासाठी योग्य अशी ठिकाणे शोधायला सुरवात केली. एका दिवशी भल्या पहाटे मी, मयुरेश आणि सार्थक कर्नाळा पक्षीअभयारण्याला भेट द्यायला निघालो. आम्ही तिघेही या क्षेत्रात अगदीच नवखे. पक्षी बघायला खूप संयम पाळावा लागतो असं नुसतं ऐकून होतो पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आमच्या तिघांपैकी कोणाकडेच नव्हता. आम्ही बस मध्ये प्रवास करतानाच आमचं बोलणं झालं होतं की आज कितीही वेळ लागला तरी black capped monarch बघायचेच!


पक्षी निरीक्षण नील नाईक, ठाणे

आम्ही अगदी अभयारण्य उघडण्याच्या वेळेलाच म्हणजे ७ वाजताच कर्नाळ्यात शिरलो. हा पक्षी काही खूप दुर्मिळ नसला तरी आम्ही नवखे असल्यामुळे आम्हाला खूप वेळ लागत होता. तीन तास उलटून गेले होते, उन्हाचे चटके आता जाणवायला लागले होते त्यामुळे थोडावेळ थांबून विश्रांती घेण्याचे सर्वांनीच मान्य केले. एक मोठं झाडं बघून आम्ही बसायला जाणार तितक्यात मयुरेशच्या समोरच्या दगडावर एक puff throated babbler येऊन बसला. त्याचे फोटो काढण्यातच गुंग असतानाच सार्थकला अखेर monarch दिसला! त्याला बघावा की फोटो काढावे हे कळत नसतानाच तो उडून गेला! परंतु तिथल्या एका फांदीवर तो सारखा सारखा येत होता, ती फांदी जमिनी पासून अगदी दोन अडीच फुटांवरच होती. जागा अतिशय अडगळीची होती, पण तरीही आम्ही तिथेच बसलो. बराच वेळ गेला, आम्ही घामाने अक्षरशः न्हाऊन निघालो. तितक्यात अगदी काही फुटांवर असणाऱ्या एका फांदीवर हा पक्षी येउन बसला! आमचा श्वास रोखला गेला होता. आमचे आजचे ध्येय पूर्ण झाले होते. या पक्षाचा पूर्णपणे वाढलेला नर आमच्यासमोर काही फुटांवर बसलेला होता त्याचा तो लक्ख निळा रंग डोळे दिपवत होता. त्याच्या डोक्यावरच्या लहानश्या काळ्या टोपीमुळे तो सिंधी बाबाच वाटत होता! त्यानंतरचा अर्धा तास मी मनभरून त्याचे निरीक्षण केले, मी खूप आनंदात होतो. घनदाट जंगलातला हा माझा पहिलाच अनुभव होता!

oriental dwarf किंगफिशर (ODKF) हा लहानगा पक्षी इतका सुंदर आणि रंगेबिरंगी आहे की पहिल्यांदा फोटो पहिला तेव्हाच मी त्याच्या प्रेमात पडलो. त्याचवेळी मी ठरवलं की काहीही झालं तरी या पावसाळ्यात हा पक्षी बघायचाच. पावसाळा सुरु झाला तसे मी आणि सार्थक येउर च्या जंगलात अगदी खालपासूनच त्याच्या शोधत भटकत निघालो. निश्चय पक्का होता की आज odkf ला शोधायचाच! ODKF हा खूप दाट जंगल आणि संथ वाहणाऱ्या झऱ्यांच्या सान्निध्यात त्याचे घरटे बनवतो. आमची भटकंती नुकतीच सुरू झाली होती आणि सुरवातीलाच आधी वर्णन केल्यासारखी एक सुंदर जागा दिसली, तेथे माणसांची तशी तुरळक असली तरी ये जा होती त्यामुळे तेथे ODKF दिसेल असे


पक्षी निरीक्षण नील नाईक, ठाणे

आम्हाला वाटत नव्हते. पण तरिही किमान तेथे जाऊन बघूया असा विचार करून आम्ही तेथे थांबायचं ठरवलं, झऱ्याच्या एका बाजूला सार्थक आणि दुसर्या बाजूला मी असे आम्ही थांबलो. थांबून केवळ १०-१५ मिनिटं झाली असतील आणि मी सार्थक कडे पाठी वळून बघितलं. सार्थक चे डोळे हवाभरून मोठे झाल्यासारखे मोठे झाले होते त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावरचा आश्चर्याचा भाव बघून मला काय झालं असेल याचा अंदाज आला. मी अगदी धावत पळतच त्याच्या बाजूला जाऊन बसलो आणि माझ्या समोरून एक गुलाबी पिवळा ठिपका प्रचंड वेगात समोरून उडत गेला. मला देखील कळायला थोडा वेळ गेला पण माझी अवस्थाही सार्थक सारखीच झाली होती! आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आम्ही पहिल्याच फटक्यात ODKF ला शोधला होतं! मग आम्ही दोघे त्याच जागेवर थोडावेळ अजून थांबायचं ठरवलं आणि त्यादिवशी अगदी खुद्द देवाच्या मनात देखील आम्ही ODKF बघावा असंच होतं कारण त्यानंतर हा सुंदर पक्षी आमच्या समोर अगदी ५-६ फुटांवर येउन बसला होता! आम्ही त्याचे फोटो काढायला सुरवात केली तितक्यात एका common kingfisher ने त्याला उडवून लावले व तो उडून आमच्या पाठच्या बाजूला जाऊन बसला. तिथे त्याचे घरटे होते असं आमच्या लक्षात आले. जवळच्या फांदीवर नर आणि मादी बसले होते. मधेच नराने उडत जाऊन मादी साठी एक गेको आणला आणि एकाच फांदीवर बसून त्या दोघांनी त्याला फस्त केला. पहिल्या फेरीतच आम्हाला इतकं निरीक्षण करता येईल असं आम्हाला बिलकुल वाटले नव्हते . नंतर मात्र आम्ही तिथून निघालो कारण आमच्यामुळे कदाचित ते चाळवले गेले असते. सार्थक खूप खुश होता कारण अखेर आम्ही ODKF बघितला होता. पण मी मात्र कोणत्याही क्षणी रडलो असतो कारण बाहेर आल्यावर माझ्या लक्षात आलं होतं की माझ्या कॅमेरात मेमरी कार्डच नव्हतं. त्यामुळे मी फोटो काढूच शकलो नव्हतो! मी कोणत्याही पक्षी संबंधीत घटनेमुळे इतका उदास झालो नव्हतो. पण शेवटी मी विचार केला की मला किमान इतका वेळ त्याचे निरीक्षण करायला मिळाले ते ही काही कमी नव्हते. मात्र तो दिवस इतका काही आनंदात गेला की काही विचारू नका.


पक्षी निरीक्षण नील नाईक, ठाणे

मला पक्षी बघतबघतच निसर्गाचं सौंदर्य अनुभवण्याच देखील वेड लागलं आणि ते स्वाभाविकच होतं. निसर्ग आपल्याला एक सकारात्मक शक्ती प्रदान करत असतो. आपण समाजाचं जसं देणं लागतो तसंच काहीसं आपण निसर्गाचं देखील देणं लागतो. त्यामुळे निसर्गाचे हे सौंदर्य अनुभवण्यासाठी त्याचे संवर्धन करणे ही आपलीच जवाबदारी आहे.


पक्षी निरीक्षण नील नाईक, ठाणे


पक्षी निरीक्षण नील नाईक, ठाणेमागील लेख पुढील लेख