1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे

सार्थक आव्हाड
12 वीत शिकत असून गेल्या एक ते दिड वर्षांपासून पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रणाची आवड. आपला कॉलेजचा अभ्यास सांभाळत पक्ष्यांचा अभ्यास करणे व त्यांची छायाचित्रे काढणे याची प्रचंड आवड. येऊर, संजय गांधी नॅशनल पार्क, ताडोबा, जिम कॉर्बेट पार्क अशा अनेक ठिकाणी भेट देऊन पक्षी निरीक्षण व छायाचित्रण करण्याचा अनुभव. ठाण्यातील अनेक पक्षी निरीक्षकांसोबत वेगवेगळ्या पक्षांचा अभ्यास व छायाचित्रण केलेले आहे.


पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग, ठाणे सार्थक आव्हाड, ठाणे

ठाणे शहराला दोन अतिशय समृद्ध अशी पक्षीनिरीक्षण करता येण्यासारखी ठिकाणे लाभली आहेत. त्यापैकी एक ठाण्याची खाडी आणि दुसरं म्हणजे येउरचंजंगल. हिवाळ्यात इथे स्थलांतर करणारे अनेक, वेगवेगळे पक्षी येतात. ठाण्याच्या खाडीवरजवळ गवताळ जमीन, मिठागरे आणि जलाशय असे महत्त्वाचे अधिवास आहेत. ह्या अधिवासात निरीक्षण करताना विविध जातींचे पक्षी आढळले आहेत. रोहित आणि मोठा रोहित हे पक्षी प्रकाशचित्रकारांच आणि निरीक्षकांचं आकर्षण. त्या व्यतिरिक्त स्थलांतर करणारे बदक(Ducks), सुरय(Terns), कुरल(Gulls), तुतवार(Sandpipers), चील्खे(Plovers), करकोचे(Storks) सुद्धा इथे जलाशयात गर्दी करतात. पक्षीमित्रांच्या सर्वेक्षणात खाडीवर १८०+ प्रकारचे विविध पक्षी सापडले आहेत.

पानगळीचे जंगले असलेल येउर ही सुद्धा ठाण्यात पक्षी निरीक्षणासाठी एक उत्तम जागा आहे. केवळ जंगलात आढळणारे रंगी-बेरंगी पक्षी ठाण्यात पहायचे असतील तर येउरसारखी दुसरी जागा नाही. थंडीचा मोसम हा योग्य काळ. पक्षीनिरीक्षकांनी इथे सर्वेक्षण केलं तेव्हा १००+ प्रकारचे पक्षी येउर मध्ये आढळले. या दोन्ही जागी फिरताना मला खूप काही वेगळं आणि दुर्मिळपाहायला मिळालं. खरोखर, ह्या जागा ठाण्यात पक्षी निरीक्षणासाठी एक स्वर्गच आहे.

एक सकाळी मी पक्षी निरीक्षणासाठी खाडी वर गेलो होतो. दुपार झाल्यावर घरी जायला निघालो तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात दोन लहान कोंबड्यासदृश्य काहीतरी पळताना दिसलं. अगदी वेगानी पळाल्यामुळे तो कोणता पक्षी होता ते ओळखता आलं नाही. मग मी थोडा वेळ थांबायचं ठरवलं. १ तास झाला तरी त्या बाहेर आल्या नाही.

दुसऱ्या दिवशी मी पहाटेच त्या जागेवर परत गेलो. पहाटेपहाटे हे पक्षी उघड्यावर खाद्य शोधायला येतात हे मला माहित होतं. यावेळी मी गवतमागे लपण्याचं ठरवलं. थोड्याच वेळात ती लहान कोंबडी बाहेर आली आणि ती "लाल छातीची पाणकोंबडी" (Ruddy-breasted Crake) आहे हे समजलं. हा पक्षी तसा संपूर्ण भारतात


पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग, ठाणे सार्थक आव्हाड, ठाणे

आढळतो. हे पक्षी भाताची शेते आणि पाण्यात उगवलेल्या गवतात राहणं पसंत करतात. परंतु लाजाळू स्वभाव असल्यामुळे हे पक्षी फार वेळ असे बाहेर उघड्यात थांबत नाही. पाण्यात सापडणारे कीटक हे त्यांचे मुख्य खाद्य.

थोड्याच वेळात दुसरी कोंबडी बाहेर पडली आणि ती ही खाद्य शोधू लागली. १-२ (एक दोन) मिनिट त्यांना मी नीट बघून घेतलं. त्यांचे फोटो घेतले आणि १५ (पंधरा) मिनिटानंतर एक दुसरी लहान कोंबडी मागे धावत जाताना दिसली. निरखून पाहिल्यावर समजलं की ती "बैल्लोंची पाणकोंबडी" (Baillon's Crake) आहे. हा या जातीतला दुसरा प्रकार. ही भारतामध्ये सापडणारी सर्वात लहान कोंबडी असून ही युरोपवरून भारतात स्थलांतर करून येते असा पक्षी अभ्यासकांचा दावा आहे. साधारणता हिवाळ्यात हा पक्षी भारतात येतो.

एकाच दिवसात दोन दुर्मिळ पक्षी सापडणं ही माझ्यासाठी भरपूर आनंदाची गोष्ट होती. तरी ह्या पक्ष्यांचं अस्तित्व आहे हे अजून लोकांना माहित नाही. लाजाळू स्वभाव, लपून राहण्याची सवय आणि छोटा आकार, कदाचित ह्यामुळेच हे पक्षी एक वेगळाच अधिवास पसंत करतात.

२-३ महिन्यानंतरच खाडीवर मला "क्रेक" चा तिसरा प्रकार "ठिपकेवाली पाणकोंबडी" (Spotted Crake) मिळाली. हा पक्षी भारतात फार कमी वेळा दिसलेला असून ह्याचे खूप कमी फोटो भारतात आहेत. ह्या दुर्मिळ पक्ष्याचे फोटो मिळवणं खूप कठीण काम आहे. याची चोच लाल-पिवळी असून तांबड्या-निळ्या अंगावर पांढरे ठिपके असतात.

थंडीत पहाटेपहाटे उठून, आळस बाजूला ठेऊन जर बाहेर पडलो आणि योग्य जागी शोधलं की हे पक्षी नक्कीच दर्शन देतात. हे पक्षी तसे ठाण्यात दर हिवाळ्यात दिसतात. आणि ते दर हिवाळ्यात आले पाहिजे ही काळजी आपण घेतली पाहिजे. मॉल, इमारती बांधण्यासाठी अधिवास नष्ट होत चालले आहेत. असंच जर होत राहिलं तर हे पक्षी जाणार तरी कुठे? (ठाण्याच्याखाडीवर ह्याआधी अनेक पक्षी मित्रांनी ह्या पक्ष्यांचा शोध लावला आहे)


पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग, ठाणे सार्थक आव्हाड, ठाणे

ठाण्याला येउर सारखं उत्तम जंगल लाभलं आहे. इथे फिरताना मला अनेक रंगीबेरंगी पक्षी पाहायला मिळाले. त्यातले काही स्थलांतर करून येणारे आहेत. पण जंगलांमध्ये पक्षी निरीक्षण करणं जरा कठीणच असतं. उंच झाडे, दाट जंगले ह्यामुळे पक्षी कधी आणि कुठे लपेल ह्याचा अंदाज लवकर येत नाही. पण, पक्षी निरीक्षणाची सवय ठेवली की जंगलातले पक्षी सहजपणे बघता येतील. त्यांचा नीट अभ्यास करता येइल.

"स्वर्गानांचन/स्वर्गीय नर्तक " (Asian Paradise Flycatcher) सारखा सुंदर पक्षी मला इथे पाहायला मिळाला. लांब, धाग्यासारखी असलेली शेपूट ह्या पक्ष्याला एक सुंदर रूप देते. उडताना तर हे पक्षी अजूनच सुंदर दिसतात. नर पांढऱ्या रंगाचा असून त्याचा तोंड आणि तुरा निळ्या चमकदार रंगाचं असतो. धाग्यासारखी लांब शेपूट असते. मादी नराएवढी सुंदर नसते. ती नारंगी रंगाची असून तिचं तोंड आणि तुरा करड्या रंगाचं असतो. तिला लांब शेपूट नसते. ह्या पक्ष्यांची शिकार करण्याची पद्धत मला खूप आवडते. एका झाडाच्या फांदीवर थांबून हे पक्षी आपल्या भक्ष्याची वाट बघतात. भक्ष्य जवळ येताच, हे पटकन उडून भक्ष्य हवेतच पकडतात आणि परत जागेवर येऊन खातात.

सुतारपक्ष्यांचेही येउर मध्ये भरपूर प्रकार आढळतात. त्या सर्वांमध्ये मला "हृदय ठिपक्याचा सुतार" (Heart-spotted Woodpecker) खूप आवडला. काळ्या-पांढऱ्या रंगाचा, लहान आकार असलेला हा सुतारपक्षी एकदा पहिला की कायमचा लक्षात राहतो तो त्याच्या पांढऱ्या पाठीवर असलेल्या बदामी आकाराच्या ठिपक्यांमुळे. ते ठिपकेच ह्या पक्ष्याला सुंदर बनवतात आणि याच्या नावाची ओळख करून देतात. अर्थातच, हा पक्षी पाहण्याची इच्छा सर्वांचीच असते.

"सर्पगरुड" (Crested Serpent Eagle) हा शक्तिशाली, मध्यम आकाराचा पक्षी येउर मध्ये मला भरपूर वेळा दिसला. जास्तीत जास्त वेळा उडतानाच दिसला. त्याचं नावच


पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग, ठाणे सार्थक आव्हाड, ठाणे

सांगून जातं की हा खाण्यासाठी साप पसंत करतो. पण हा फक्त सापच खात नाही, तर लहान पक्षी, छोटे-मोठे सस्तन प्राणी ही खाताना दिसतो. उडताना हा शिळेसारखा आवाज देतो. हा आवाज संपूर्ण जंगल जागं करतो आणि प्राण्या-पक्ष्यांना एक चेतावणी देतो. इतर शिकारीपक्ष्यांसारखा हा पण दुपारच्या वेळी उडताना दिसतो.

पक्ष्यांची नक्कल करून, पक्षीनिरीक्षकांना वेडं करून ठेवणारा महाभृंगराज (Greater Racket tailed Drongo) हा तसा येउर मध्ये सामान्यपणे दिसणारा पक्षी. काळ्या रंगाचा हा कोतवाल एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना दिसतो आणि कधी कधी वाळक्या फांदीवर बसून नक्कल करताना पण दिसतो. पहाटे आणि तिन्हीसांजेला हा कार्यक्षम असतो आणि भरपूर वेळा दिसतो. विशिष्ट प्रकारची शेपूट आणि तुर्यामुळे ह्याला ओळखणं जर सोप्प जातं.

पक्षी निरीक्षकांनी इथे भरपूर पक्षी शोधून काढले आहेत. तपास-सूची मोठी आहे. राखी धनेश (Indian Grey Hornbill), तीनबोटी खंड्या (Oriental Dwarf Kingfisher), टकाचोर (Rufous Treepie), मराठा सुतार (Yellow fronted Woodpecker), पावशा (Common Hawk Cuckoo), शिक्रा (Shikra) इ. हे त्या सूची मधले काही. ही सूची आणि इथल्या पक्ष्यांची संख्या वाढतच राहिली पाहिजे असा मला नेहमी वाटतं.


पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग, ठाणे सार्थक आव्हाड, ठाणेमागील लेख पुढील लेख