1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

प्रकाशचित्रणाचा छंद

गिरीश वझे
सुप्रसिध्द निसर्ग प्रकाशचित्रकार गिरीश वझे यांना ऍस्ट्रोनॉमी आणि ऍस्ट्रोफोटोग्राफीचीसुध्दा आवड आहे.


अनुवाद - सुजाता बाबर


प्रकाशचित्रणाचा छंद गिरीश वझे, ठाणे

"छंद" म्हणजे काय? तर "फुरसतीच्या वेळेत आनंदासाठी नियमित केलेली कृती" अशी त्याची साधारण व्याख्या होऊ शकेल. मला असं वाटतं की ही व्याख्या थोडी विस्तारित करायला हवी. “"छंद" म्हणजे अशी कृती जी नियमितपणे केलीच पाहिजे असे नाही पण फुरसतीच्या वेळेत तुम्हाला नेहमी करावीशी वाटते, जी तुम्हाला आनंद देते आणि ज्यामधून तुमचा वैयक्तिक विकास होतो" अशी छंदाची व्याख्या असायला हवी. छंद हा जेव्हा तुमचा ध्यास बनतो, तेव्हा तो जीवनाचा मार्ग होतो. तुम्ही त्या छंदामध्ये श्रेष्ठत्व मिळविण्यासाठी अनेक गोष्टी आत्मसात करायला सुरुवात करता आणि यामुळे तुमची विचारपद्धती आणि दृष्टीकोन बदलतो.

पक्षीनिरीक्षण आणि निसर्ग प्रकाशचित्रण हे माझे छंद! २००५ मध्ये मी काही मित्रांबरोबर प्रथमच जंगलात गेलो आणि मी त्यात पूर्णपणे मग्न झालो. तेव्हापासून मला अधिकाधिक जंगले पहायची ओढ निर्माण झाली आणि पक्षीनिरीक्षणाची कमालीची आवड निर्माण झाली. प्रारंभिक काळात कोणत्याही छंदासाठी अत्यंत आवश्यक आहेत अशा अशा दोन गोष्टी माझ्याकडे पुरेपूर होत्या, त्या म्हणजे संधी आणि मार्गदर्शन. उरण हे पक्षीनिरीक्षकांसाठी एक स्वर्गच आहे. उरणमध्ये दलदलीचा आणि गवताळ असे दोन्ही प्रदेश असल्यामुळे तो एकदम रुचीपूर्ण (रुचीपूर्ण शब्द खटकतोय) प्रदेश आहे आणि (आणि ची गरज वाटत नाहीये) माझ्या तांत्रिक विकासाला इथे भरपूर संधी मिळाली. आदेश शिवकर आणि पराग दामले यासारख्या मित्रांकडून मार्गदर्शन मिळाले. त्यांनी मला पक्षी ओळखायला आणि त्यांचे वर्तन अभ्यासायला आणि समजून आनंद घ्यायला शिकवले.

मला प्रकाशचित्रणाची पहिल्या पासून आवड होती. त्याच्याबरोबर वन्यजीवन आणि पक्षीनिरीक्षण या छंदाची सहज सांगड घातली गेली आणि मी निसर्ग प्रकाशचित्रणात चांगलाच रमलो. माझी उत्कटतापक्षीनिरीक्षणापासून पक्षीचित्रणामध्ये रुपांतरीत झाली. गेली काही वर्षे दुर्मिळ प्रजातींच्या प्रतिमांसाठी मी अधिकाधिक लांबवर जायला सुरुवात केली आहे. जेव्हा तुम्ही काहीतरी चांगले करता, त्यावेळी तुम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचविण्याची आणि प्रदर्शित करण्याची देखील इच्छा निर्माण होते. मी माझ्या निसर्ग प्रकाशचित्रांमधील काही प्रतिमा या


प्रकाशचित्रणाचा छंद गिरीश वझे, ठाणे

“इंडियननेचरवॉच” www.indianaturewatch.net या संकेतस्थळावर पाठवायला सुरुवात केली. लवकरच माझ्या त्या फोटोंचे कौतुक व्हायला लागले. लोकांनी माझ्याशी प्रकाशचित्रणविषयक सूचना, उपकरणे संबंधित निर्देशक, वन्यजीव आणि पक्षीनिरीक्षणासाठी योग्य जागा अशासाठी संपर्क करायला सुरुवात केली. हे नेटवर्क चांगले फुलायला लागले. जसजसे अधिकाधिक लोकांनी मार्गदर्शनासाठी मला विचारायला सुरुवात केली, तसतसे अधिक योग्य उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करू लागलो . पक्षीनिरीक्षण आणि प्रकाशचित्रण या विषयांचा विस्तृतपणे अभ्यास आणि संशोधन सुरु केले. ही प्रक्रिया माझ्यासाठी महत्वाची होती. या प्रक्रियेने माझ्या जीवनाला नवे आयाम दिले. आजही ही प्रक्रिया माझ्या प्रेरणेचा आणि विकासाचा स्त्रोत आहे. तुम्हाला एखादा विषय समजून घ्यायचा असेल तर तो शिकविला पाहिजे हे अगदी सत्य आहे. शिकविण्यासाठी तुम्ही विषय तयार करता तेव्हा तुम्ही त्याच्या खोलात शिरून त्या विषयाचे बारकावे समजून घेता. एखाद्या वन्यजीव पर्यटनस्थळावर गेल्यावर लोक मला भेटतात. वेगवेगळ्या व्यासपीठांवरचे माझे काम पाहिल्याचे सांगतात आणि त्यातून त्यांना निसर्ग प्रकाशचित्रणासाठी प्रेरणा मिळाली आहे असे सांगतात. हे माझे खरे पारितोषिक आहे.

माझ्या या छंदाने मला फक्त विषय नव्हे तर विषयाच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी शिकविल्या आहेत. पहिले म्हणजे विनय. माणूस हा त्याने निर्माण केलेल्या जगामध्ये राहतो. त्याच्याभोवती त्याने तयार केलेल्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्याच्या इच्छेप्रमाणे तो त्या गोष्टी बदलू शकतो. या शक्तीचा त्याला अहंकार आहे. यामुळे नकळतपणे अपराजित्वाची, अजिंक्यपणाची भावना निर्माण होते. परंतु, आपण जेंव्हा जंगलांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात राहतो, तिथल्या प्रचंड मोठ्या नद्या आणि पर्वत पाहतो, त्यांचा उत्तुंगपणा समजतो, भावतो, तेव्हा निसर्गाच्या तुलनेत आपण खरोखर किती लहान आणि क्षुद्र आहोत हे लक्षात येते. तुम्ही एखादी नवी गाडी घेतली किंवा नवीन नोकरी


प्रकाशचित्रणाचा छंद गिरीश वझे, ठाणे

मिळाली किंवा एखादा नवीन सिनेमा पाहिलात तर निसर्गाच्या या अद्वितीयामध्ये त्याचे महत्व अगदी क्षुल्लक असते. त्याने लाटांची लय बदलत नाही, त्याने पर्वताच्या उंचीत अगदी अणूमात्र फरक पडत नाही. पृथ्वीतलावरचे आपले जीवन आणि आपले परिश्रम हे निसर्गमातेच्या आठवणीमध्ये अगदी हलकी फुंकर आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे हे छंद तुम्हाला कमालीचा संयम शिकवितात. निसर्ग प्रकाशचित्रणामध्ये (विशेषत: नैतिक प्रकाशचित्रणाच्या सीमेत राहून) श्रेष्ठत्व मिळविण्याच्या प्रयत्नामध्ये समर्पण, मेहनत आणि सहनशीलतेचा मोठा वाट आहे. माझी एक आवडती प्रतिमा आहे ती “ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर” (तीबोटी खंड्या) नावाच्या पक्षाची. पावसाळा सुरु झाल्यावर मुंबईच्या आसपासच्या जंगलांमध्ये केवळ घरटी बांधण्यासाठी स्थलांतर करतात. घरट्यासाठी ठिकाणे शोधत असतात. त्या अतिशय चपळ असतात व क्वचितच फार काळ एकाच ठिकाणी बसतात. जेव्हा त्या घरट्यात असतात किंवा पिल्लांच्या सोबत असतात तेव्हा प्रकाशचित्र घेणे हे अगदी सोपे असते. पण असे करण्यामध्ये त्या पक्षांना त्रास होण्याची आणि त्याने ते घरटे आणि पिल्ले सोडून जाण्याचा धोका असतो. याच कारणासाठी मी कधीही घरटी करणाऱ्या पक्षांचे छायाचित्रण करत नाही. तीबोटी खंड्याचे प्रकाशचित्र घेणे हे तसेही अतिशय अवघड आहे. मी कित्येक वेळा त्याला शोधला असला तरी मला त्याचे प्रकाशचित्र घेण्यासाठी ४ वर्षे मेहनत करावी लागली, कारण तो अगदी मिनीटभरात दिसेनासा होत असे. सगळ्याच कामांमध्ये चिकाटी हा अत्यावश्यक गुण गरजेचा असतो आणि निसर्ग प्रकाशचित्रणामध्ये विशेष करून लागतो.

बरेच वेळा जेव्हा मी लोकांना अमुक एक पक्षी कुठे शोधायचा हे सांगितलेले असते. काही दिवसांनी मला त्यांचा फोन येतो, “मला तिथे काहीच दिसले नाही, तुम्ही नेमके कुठे सांगितले होते?” अशावेळी हे समजून घेतलेच पाहिजे की “पक्षी उडू शकतात!”. पक्षीनिरीक्षकाने त्या निर्देशित क्षेत्राचे सखोल संशोधन करणे अपेक्षित आहे, कारण आपण त्या जागी पोहोचल्यावर ते पक्षी दिसतील अशी आशा करू शकत नाही.


प्रकाशचित्रणाचा छंद गिरीश वझे, ठाणे

आपण जामनगरला आलेल्या पाणचीऱ्यांच्या समूहाबद्दल ऐकले असेल. पाणचीरे हे साधारणत: चंबळच्या खोऱ्यामध्ये सर्वात चांगले दिसतात आणि प्रकाशचित्रीत करता येतात. जामनगरला ते जवळ जवळ ५ – ६ वर्षांनी आले होते आणि त्यामुळे आम्ही आठवड्याच्या शेवटी काही दिवस त्यांच्या शोधात जायचे ठरविले. मागच्या वेळेस जिथे ते दिसले होते तिथे आम्ही गेलो पण त्यांचा लवलेशही तिथे दिसला नाही. ते स्थलांतर होताना काही दिवस जामनगरला उतरले असावेत आणि आता पुन्हा मार्गस्त झाले असण्याची शक्यता होती. आसपासच्या किनारपट्टीचा तपशीलवार शोध घेतल्यावर शेवटी दूरवर एका किनाऱ्यावरआम्ही ३० पक्षांचा थवा शोधून काढला. तिथे जाण्यासाठी स्पष्ट असा काही मार्ग नव्हता पण आम्ही काटेरी जंगलांमधून मार्ग तयार केला. शेवटी ते पक्षी जिथे होते त्या किनाऱ्यावर आम्ही पोहोचलो. तिथे ओल्या वाळूमध्ये सकाळ – संध्याकाळ सरपटत त्यांचे फोटो घेण्यात आम्ही दोन पूर्ण दिवस घालवले. इतक्या प्रयत्नानंतर मला दोनच बऱ्यापैकी प्रतिमा मिळाल्या.

निसर्ग प्रकाशचित्रणाचा एक महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे संधी. निसर्गामध्ये घटना त्यांच्या स्वतःच्या गतीमध्ये, लयीमध्ये घडत असतात, त्यांना वेळापत्रक नसते. तुम्हाला फक्त संधी निर्माण करायच्या असतात,म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जायचे आणि शक्य तितक्या वेळेला प्रकाशचित्रण करायचे. निसर्गामधील कृतींच्या प्रकाशचित्रणामध्ये “ नशीब” हा एक मोठा घटक आहे. केवळ अभयारण्ये आणि आरक्षित ठिकाणीच गेल्यानंतर आपल्या कौशल्यांचा सराव करणारे अनेक प्रकाशचित्रकार मी पाहतो. त्यांना जर शिकायचे असेल आणि त्यात श्रेष्ठत्व मिळवायचे असेल, तर त्यांनी पुन्हा पुन्हा आधीच्या ठिकाणी आणि विषयांकडे गेले पाहिजे. आधी प्रकाशचित्रित केलेल्या विषयांमध्ये नवा, ताजा दृष्टीकोन आणला पाहिजे. निसर्ग प्रकाशचित्रणामधून अशा अनेक शिकवणुकी मिळतात. तुम्ही श्रेष्ठत्वासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कमतरता दिसायला लागतात आणि त्या दूर करण्यासाठी तुम्ही पुन्हा शिकण्यास सुरुवात करता. यामुळे तुमच्यात आणि तुमच्या दृष्टीकोनात बदल निर्माण होतो. स्वाभाविकपणे तुमच्या आसपासच्या लोकांवरयाचा प्रभाव पडतो आणि ते देखील त्यांच्यामध्ये बदल आणायला सुरुवात करतात. आणि प्रतिक्रियांची ही एक शृंखलाच तयार होते. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या विषयात पूर्णपणे तल्लीन होवून जाता तेव्हा तो तुमचा जीवनमार्ग बनतो.

तुम्ही श्रेष्ठत्वासाठी इतके आतुर असायला हवे की त्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची देखील तयारी असेल. होतकरू निसर्ग प्रकाशचित्रकारांसाठी मी काही सूचना मला कराव्याशा वाटतात. तुमच्या सगळ्या परिश्रमांमध्ये निसर्ग मातेचा आदर करा. नैतिक प्रकाशचित्रण करा आणि पर्यावरणाचे नुकसान करू नका. शिकत राहा, वाचत राहा. तुमची कलाकुसर सुधारण्याकडे लक्ष ठेवा. जुन्या विषयाला परत भेट द्या, पण नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. उपकरणांनी मन व्यापून टाकू नका: उत्तम उपकरणे हे आव्हानात्मक परिस्थितीमध्ये चांगल्या प्रतिमा घेण्यासाठी आपल्याला सक्षम करतात यात शंकाच नाही, पण चांगली उपकरणे तुम्हाला चांगल प्रकाशचित्रकार बनवीत नाही. कॅमेरा आणि लेन्स ही फक्त साधने आहेत, उत्तम प्रकाशचित्रण आतून आले पाहिजे.


प्रकाशचित्रणाचा छंद गिरीश वझे, ठाणे

निसर्ग आणि प्रकाशचित्रणाच्या प्रक्रियेचा आनंद घ्या. पक्षाचा किंवा प्राण्याचा “तो” क्षण टिपण्याने मन ग्रस्त करून टाकू नका. त्या क्षणाचा आनंद घ्या. तुमचे प्रयत्न, समर्पण, आणि बांधिलकी हे तुम्हाला श्रेष्ठ बनवतील. स्वत:च्या मर्यादांमध्ये आपला छंद सीमित करू नका, याऐवजी तुमच्या छंदाला कवटाळण्यासाठी स्वतःला मुक्त करा. तरच तुम्ही प्रगती कराल, उत्कृष्ट व्हाल, स्वतःला नव्याने पुनर्निर्मित कराल. तुम्हाला अतीव समाधान आणि यशप्राप्तीची समज येईल. तुम्ही गुरु व्हाल, आणि ज्यांना तुमच्या उत्कटतेचे नवल वाटते आणि जे तुमचा पावलावर पाउल टाकू इच्छितात त्यांच्यासाठी तुम्ही मार्गदर्शक दीप व्हाल.

मागील लेख पुढील लेख