1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

ऑफबीट

नीरज भांगे
इंडियन नॅशनल इंस्टिटय़ुट, नागपूर येथून प्रकाशचित्रणात डिप्लोमा करणारे निरज भांगे गेली 21 वर्षे विविध वृत्तपत्रात काम करीत आहेत. प्रकाशचित्रणातले अनेक पुरस्कारही त्यांच्या नावावर आहेत.


ऑफबीट नीरज भांगे, अकोला

कुठल्याही प्रकाशचित्रकाराची नजर कायम 'ऑफबीट' विषयाच्या शोधात असते. नियमित प्रकाशचित्रण करताना, वर्तमानपत्रासाठी बातमीदाराच्या सोबत फिरताना किंवा कुठेही, कधीही आमची नजर सतत भिरभिरत असते. याचं कारण म्हणजे व्यवस्थित लक्ष ठेवलं तर हव्या असलेल्या फोटोंबरोबर 'हटके' फोटोही नक्कीच मिळतात. तसं वेगळं काही नजरेला दिसलं की लगेचच कॅमेरा शटर क्लिक करण्यासाठी बोटं वळवळायला लागतात.

मध्यंतरी एका पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणी टंचाईवर चर्चा सुरु होती. त्या सभेला दोन-चार आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी वगैरेही उपस्थित होते. मात्र या चर्चेदरम्यान् सगळ्यांच्या समोर एक एक मिनरल वॉटरची बाटली ठेवली होती. त्यातही पालकमंत्री जेव्हा त्या पाण्याच्या बाटलीतले पाणी पिऊ लागले तेव्हा साहजिकच हा 'ऑफबीट' क्षण टिपण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर या प्रकाशचित्रावरून बातमी तयार करण्यात आली, जिचा मथळा होता 'मिनरल वॉटरच्या साथीने पाणी टंचाईवर चर्चा!'

असे बरेच प्रसंग प्रकाशचित्रकाराच्या वाट्याला नेहेमीच येतात किंवा आम्हीच तशा क्षणांच्या शोधात असतो असे म्हटले तरी चालेल. कारण असे प्रकाशचित्रण करायला खरी मजा येत असते. मागे एक प्रकाशचित्र पाहण्यात आलं होतं. त्यात मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपात एक रसिक प्रेक्षक मस्तपैकी इंग्रजी वर्तमानपत्र वाचत होता. हा फोटोही त्यावेळी खूप भाव खाऊन गेला. असा वेगळा क्षण टिपणारी , विसंगती टिपणारी प्रकाशचित्रे काढण्यात प्रकाशचित्रकाराला खरी रूची असते. समाजात उघड्या नजरेने वावरताना नेहेमीच असे प्रसंग दृष्टीस पडतात. उदा. गायीचे दूध पिणारे बकरीचे करडू, भर पावसात रेनकोट घालूनही डोक्यावर छत्री धरणारी युवती किंवा एकाच बाईकवर बसून तीन ट्रॅफीक पोलिसांचा प्रवास. मध्यंतरी एका असाही फोटो बघण्यात आला त्यात एका माणसाच्या एका हातात चहा आणि एका हातात थम्प्सअपची बाटली होती !


ऑफबीट नीरज भांगे, अकोला

खरंतर असे काही प्रसंगच जीवनात रंगत आणत असतात, आपल्याला हसवत असतात, 'रिचार्ज' करत असतात. आणि म्हणूनच आमच्यासारखे प्रकाशचित्रकारही अशा वेगळ्या , हलक्याफुलक्या क्षणांना टिपण्याच्या प्रतिक्षेत असतात. वाचकांनाही असे विसंगती दाखवणारे, वेगळे क्षण दाखवणारे फोटो नक्कीच आवडतात. वर्तमानपत्र उघडल्यावर सहजपणे वाचकांची नजर अशा प्रकाशचित्रांना शोधते. त्यामुळे मी तर म्हणेन की खरा प्रकाशचित्रकार तोच ज्याला असे क्षण ओळखण्याची नजर आहे. अशी 'ऑफबीट' नजर आणि असे प्रकाशचित्रण करण्याचे कसब हीच प्रकशचित्रणातील 'जान' आहे.


ऑफबीट नीरज भांगे, अकोला


ऑफबीट नीरज भांगे, अकोला
मागील लेख पुढील लेख