1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

मुलाखत

सिया खारकर, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया
लॉस एंजेलिस येथे रहाणार्या सिया खारकर या स्वत:चा 'डिवाईन शॉट्स फोटोग्राफी' हा स्टुडियो चालवतात. त्यांना व्यकतीचित्रण करायला अाणि त्यातून मानवी भावना, स्वभाव यांचे चित्रण करायला फार आवडते.


मुलाखत आणि अनुवाद - स्वप्नाली मठकर


डिव्हाईन शॉट्स, सिया खारकर - मुलाखत, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया

एका मराठी मुलीचा अमेरिकेत, कॅलिफोर्निया भागात स्टुडियो आहे हे कळलं तेव्हा नक्कीच तिच्याशी बोलावं असं 'फ-फोटोचा' अंकाच्या टिमला वाटलं. नंतर 'डिव्हाईन शॉट्स' या तिच्या वेबसाईटचा पत्ताही कळला. त्यावरचे फोटो बघून अंकासाठी तिची मुलाखतच घ्यावी या विचारांना चालना मिळाली. पण प्रत्यक्ष बोलून भेटून मुलाखत घेणे शक्यच नव्हते. त्यामुळे आम्ही हा इ-मुलाखतीचा पर्याय निवडला. सिया खारकर यांनी २००६ साली कॅलिफोर्निया भागात 'डिव्हाईन शॉट्स फोटोग्राफी' हा स्टुडियो चालू केला. स्टुडियो चालू करण्यापासून त्यांना काय अनुभव आले, त्यांचे काम कसे चालते याविषयीच्या आमच्या प्रश्नांना सिया खारकर यांनी दिलेली ही उत्तरे.

तुम्ही प्रकाशचित्रण करण्याची सुरूवात कधी केली? तुमचा छंद म्हणून तुम्ही या व्यवसायात आलात का?
प्रकाशचित्रण हा खरंतर माझे पती श्री. योगेश खारकर यांचा छंद होता. ते नेहेमी घरातल्यांचे, मुलांचे फोटो काढायचे. नंतर त्या प्रकाशचित्रांमधल्या आठवणी बघायला खूपच छान वाटायचे. म्हणूनच मी प्रकाशचित्रणाकडे वळले. मला वाटतं प्रकाशचित्रण म्हणजे आठवणींचा एक खजिना आहे आणि पिढ्यान् पिढ्या तो जपला जाऊ शकतो. त्याद्वारे आपण आपला इतिहास, आपल्या आठवणी जपून ठेवू शकतो.

आता तुमचा अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया भागात स्टुडियो आहे. ही खरच खूप मोठी कामगिरी आहे. तुम्ही स्वत:चा स्टुडियो चालू करायचे कसे काय ठरवलेत? स्टुडियोची सुरूवात कशी झाली? तुमच्याबरोबर किती लोक काम करतात?
सुरूवातीला मी माझ्या मित्रमैत्रिणींचे, घरातल्यांचे फोटो काढत गेले. आणि हळूहळू मला असं जाणवलं की मला प्रकाशचित्रण खूप आवडतंय. प्रकाशचित्रण करताना माझ्यातली कलात्मकता बहरतेय. मग मला वाटलं की याबद्दल अधिक काहीतरी शिकणं जरूरी आहे. प्रकाशचित्रण हा


डिव्हाईन शॉट्स, सिया खारकर - मुलाखत, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया

व्यवसाय म्हणून चालू करायचा तर नुसते प्रकाशचित्रण येऊन भागणार नाही तर तो व्यवसाय कसा करायचा याचेही शिक्षण घेणे जरूरी आहे. त्यानंतर मी बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आणि त्याचबरोबर फोटोग्राफीच्या विविध कार्यशाळांमध्ये भाग घेतला. डिजीटल एडिटिंग शिकून घेतलं. या शिक्षणानंतर मला आपण काहीतरी करू शकतो असा आत्मविश्वास आला. त्यानंतर मी 'डिवाईन शॉट्स' फोटोग्राफीचा स्टुडियो आणि ऑन लोकेशन फोटोग्राफीचा व्यवसाय चालू केला. आता या कामात मला माझे पती श्री. योगेशची त्यांच्या सुट्टीच्या दिवशी मदत होते.

तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रकाशचित्रण करायला आवडते? व्यकतीचित्रणाकडे तुम्ही कशा वळलात?
मला माझ्या प्रकाशचित्रांमधून मानवी भावना, स्वभाव दाखवायला आवडतं. माझ्या क्लाएंटशी बोलायला, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. सहज गप्पांमधून मी त्यांचा स्वभाव, भावना जाणून घेते. माझ्या प्रकाशचित्रांतून मला त्यांचे नातेसंबंध दाखवायलाही आवडतं.

तुमच्या क्लाएंटची तुमच्या प्रकाशचित्रांकडून काय अपेक्षा असते? तुम्ही त्यांच्या गरजा कशाप्रकारे जाणून घेता? क्लाएंटकडून एखादी वेगळी मागणी आली तर ती तुम्ही कशी पूर्ण करता? फोटोशूट ची तयारी कशी करता?
शूट नक्की करायच्या आधी मी नेहेमीच क्लाएंटबरोबर मिटिंग घेऊन त्यांच्या गरजा समजून घेते. त्यांच्या अपेक्षा काय आहेत याची माहिती घेते. शूटच्यावेळी कुठले कपडे घालावे याबद्दल मार्गदर्शन करते. तसेच आणखी विविध कपडे बरोबर घेऊन यायला सांगते. क्लाएंटची काही विशेष विनंती असेल तर मी तसे फोटो काढायचा नेहेमीच प्रयत्न करते. क्लाएंटशी झालेल्या बोलण्यावरून शूटची तयारीही मी आधीच करून ठेवते. त्यामुळे कपड्याच्या रंगाच्या बाबतीतली माहिती मला आधीच असते. ही माहिती प्रत्यक्ष शूट करायच्या वेळी खूप उपयोगी पडते. गरज पडल्यास स्टुडियोमध्ये


डिव्हाईन शॉट्स, सिया खारकर - मुलाखत, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया

मेकअप आणि केशभूषाकार यांनाही बोलावते.

गेली काही वर्षे फोटोग्राफीच्या व्यवसायात असल्यामुळे तुम्हाला नक्कीच काहितरी वेगळे अनुभव आले असतील. काही अविस्मरणीय घटना असतील. शक्य असेल तर आम्हाला त्याबद्दल काही सांगाल का?
खरं सांगायचं तर प्रत्येक व्यक्तीच युनिक असते. मला आत्तापर्यंत कधीच सारख्या व्यक्तिमत्वाची माणसं भेटली नाहीत असे म्हणायला हरकत नाही. मागच्या वर्षी मी 'थर्टी डेज वन कॉज' नावाची एक चॅरीटी कँपेन केली होती. या कँपेनमध्ये मी अल्झायमर या आजाराने ग्रस्त असलेल्या वयस्करलोकांचे फोटो काढले होते. त्यावेळी मला खरंच इतक्या प्रकारची लोकं भेटली की बस्! त्यालोकांकडे पाहून त्यांच्या नात्यामधला हळूवारपणा जाणवला आणि नकळत माझे डोळे ओलावले.

परदेशात फोटोग्राफी व्यवसाय करणे आणि भारतात असा व्यवसाय करणे यात काय फरक आहे असे वाटते. भारतात फोटोग्राफी हा व्यवसाय करणार्‍या फोटोग्राफरना तुम्ही काय सल्ला द्याल?
इथे अमेरीकेत लोक फोटोंना खूप जास्त महत्व देतात. फोटो म्हणजे एखादी परंपरा असल्यासारखे ते पुढच्या पिढ्यांकडे दिले जातात, जपले जातात. दाग-दागिन्यां इतकच फोटो, अल्बम जपण्याला प्राधान्य दिलं जातं. भारतात फक्त काही मोठे कार्य जसे लग्न, मुंजी, पूजा अशा प्रसंगातच लोक फोटोग्राफरला बोलावतात. इथे तसे नाही. अगदी बाळ जन्मल्या दिवशीसुद्धा इथे प्रोफेशनल फोटोग्राफर बोलावले जातात. त्यामुळे अर्थातच कलात्मकतेला खूप वाव आहे आणि या व्यवसायाला खूप मागणीही आहे. या व्यवसायामध्ये स्पर्धा सगळीकडेच आहे. त्यामुळे तुम्ही काढलेले फोटोच तुमची जाहिरात करत असतात. ते फोटो इतर फोटोंच्या गर्दीत वेगळे उठून दिसायला हवेत. शिवाय तुमच्याकडे संवाद साधण्याची कला नक्की हवी. ती आत्मसात करणे फार गरजेचे आहे.

www.divineshots.com


डिव्हाईन शॉट्स, सिया खारकर - मुलाखत, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया


डिव्हाईन शॉट्स, सिया खारकर - मुलाखत, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया


डिव्हाईन शॉट्स, सिया खारकर - मुलाखत, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया


डिव्हाईन शॉट्स, सिया खारकर - मुलाखत, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया


डिव्हाईन शॉट्स, सिया खारकर - मुलाखत, लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया


मागील लेख पुढील लेख