1) प्रस्तावना 2) वाघ माझ्या कॅमेऱ्यातून 3) लँड ऑफ रोअर अँड ट्रम्पेट 4) ऑफबीट 5) मी आणि माझी फोटोग्राफी 6) अ‍ॅमराल्ड ग्रीन 7) जत्रा 8) मुलाखत - सिया खारकर, लॉस एंजेलिस 9) हा छंद जीवाला लावी पिसे 10) मुलाखत - आर्थर मोरीस, फ्लोरिडा 11) इस्तंबूल - एक झलक 12) पहिला धडा 13) जंगलातले दिवस..... 14) स्पोर्ट्स फोटोग्राफी 15) मुलाखत - गोपाळ बोधे, मुंबई 15A) गोपाळ बोधे - स्लाईड शो 16) माझी टेबलटाप फोटोगीरी 17) गा विहगांनो माझ्यासंगे! 18) कशी नशिबाने थट्टा मांडली 19) 'रेघोट्या' 20) शिरीष कराळे - स्लाईड शो 21) केरळ - एक अनोखी संस्कृती 22) प्र.चित्र स्पर्धा परीक्षकाच्या दृष्टीतून 23) पक्षी निरीक्षण 24) पक्षी निरीक्षकांचा स्वर्ग - ठाणे 25) प्रकाशचित्रणाचा छंद 26) पाणी - द स्टोरी ऑफ वॉटर © Copyrights All Rights Resreved

मुलाखत

ऑर्थर मोरीस - पक्षी आणि वन्यजीव प्रकाशचित्रकार
अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले ऑर्थर मोरीस हे अमेरिकेतील फ्लोरिडा इथले प्रसिद्ध पक्षी आणि वन्यजीव प्रकाशचित्रकार. विविध मासिकात ते नेहेमीच लेख लिहीत असतात. १९९५पासून ते कॅनन कॉन्ट्रॅक्ट फोटोग्राफर आहेत. काही प्रदर्शने, पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांची ११०००हून अधिक प्रकाशचित्रे नॅशनल जिओग्राफिक, आउटडोअर फोटोग्राफी, अमेरिकन बर्डस अशा अनेक मासिकांमधून प्रकाशित झालेली आहेत. ते प्रकाशचित्रण आणि लिखाणाबरोबरच फोटोटूर्स नेतात, फोटोग्राफीचे स्लाईडशो करतात, फोटोग्राफी शिकवतात.

मुलाखत आणि अनुवाद - स्वप्नाली मठकर


'बर्ड अॅज आर्ट', मुलाखत - ऑर्थर मोरीस, फ्लोरीडा, युएस

काही वर्षांपूर्वी जेव्हा इंटरनेटवर ऑर्थर मोरीस यांनी काढलेले पक्ष्यांचे फोटो पाहिले तेव्हा खरोखरच आश्चर्यचकीत झाले होते. चित्रातला शार्पनेस, इतका सुंदर बोके आणि चित्रातली कलात्मकता खिळवून टाकणारी होती. त्यानंतर त्यांना फॅनइमेलही पाठवले आणि त्यावर त्यांचे लगेच उत्तर आले. त्यांच्याविषयी अधिक वाचले तेव्हा त्यांनी प्रकाशचित्रणासाठी घेतली मेहेनत अधिकच कळून आली. सर्वात आवडले ते म्हणजे त्यांनी पक्ष्यांच्या प्रकाशचित्रणाला दिलेले 'बर्ड अॅज आर्ट' हे नाव. मेहनत, झोकून देण्याची वृत्ती, कलात्मकता आणि पक्ष्यांची सविस्तर नोंद अशा अनेक गोष्टी ऑर्थर मोरीस यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेतच. पण त्यांचे प्रोफेशनल असणेही तितकेच लक्षात घेण्यासारखे आहे. 'फ फोटोचा' दिवाळी अंकासाठी इ-मुलाखतीबद्दल विचारल्यावर ऑर्थर यांनी काही दिवसातच आपला होकार कळवला. पण त्याकाळात आफ्रिकेमध्ये फोटोटूरवर असल्याने मुलाखतीसाठी प्रश्नांची उत्तरे ३१ ऑगस्टनंतरच देता येतील असेही त्यांनी कळवले. त्याप्रमाणे मी एक आठवडा आधी म्हणजे २४ तारखेला भारतातल्या रात्री त्यांना प्रश्न तयार करून पाठवले. सकाळी उठून इमेल पाहिले तर त्यांनी संपूर्ण मुलाखतीची उत्तरे लिहून पाठवली होतीच शिवाय फोटोही दिले होते. वयाने आणि अनुभवाने इतक्या मोठ्या असलेल्या फोटोग्राफरने दिवसभराच्या फोटोशूटनंतरही सविस्तर उत्तरे लिहून पाठवलेली पाहून खरोखरच मी थक्क झाले! तर आता अधिक न बोलता या फोटोग्राफर बद्दल जाणून घेऊया.

ऑर्थर, तुम्ही बरीच वर्ष प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केलंत, त्यानंतर अचानक तुम्ही प्रकाशचित्रणाकडे कसे काय वळलात? प्रकाशचित्रणच करायचे असे कसे काय मनात आले?
जवळजवळ २३ वर्षे मी न्यूयॉर्क सिटी स्कूल मध्ये प्राथमिक शाळा शिक्षक म्हणून काम करत होतो. १९९३मध्ये माझी पत्नी एलिन आणि मी ठरवलं की आता शाळेतली नोकरी


'बर्ड अॅज आर्ट', मुलाखत - ऑर्थर मोरीस, फ्लोरीडा, युएस

खूप झाली. मला माझे स्वप्न जगून पहायचे होते. त्याआधी मी सुमारे सात वर्ष पक्षी निरीक्षण करत होतोच. नुसते पक्षीनिरीक्षण करणे जरासे कंटाळवाणे वाटू लागले. काहीतरी अजून करावे असेही वाटत होते. त्याच सुमारास मी इथल्या दोन पक्षी प्रकाशचित्रकारांचे फोटो पाहिले आणि मला वाटलं की आपणही प्रकाशचित्रण करावे. आपल्याला नक्की जमेल असेही वाटले होते जे नंतर खरे झाले.

म्हणून आम्ही आमच्या नोकरीतून एक वर्षाची सुट्टी घेतली. त्याला इथे sabbatical म्हणतात. त्यानुसार आम्हाला शिक्षण अथवा प्रवासासाठी एक वर्षाची सुट्टी घेता येते. तर अशी सुट्टी घेऊन आम्ही एलिनच्या आईवडिलांच्या घराजवळ फ्लोरीडा इथे रहायला गेलो. तिथे बेस करून आमचा प्रकाशचित्रणाचा प्रवास सुरू झाला.

तुम्ही सुरूवातीच्या काळात खूप प्रवास केलात. त्या काळाबद्दल जाणून घ्यायला मला आवडेल. तुम्ही सतत फिरतीवर रहायचे हे कसे काय ठरवलेत?
हो! त्याकाळात आम्ही खूपच प्रवास केला. वर्षाची सुट्टी घेऊन फ्लोरिडाला गेलो. तिथे छोटे मोटरहोम विकत घेतले. आणि उत्तर अमेरिका दोन वेळा पालथी घातली. बरीच फोटोग्राफी केली. तो आमच्या आयुष्यातला अतिशय सुंदर काळ होता. एलिन माझी उत्तम मैत्रिण होतीच पण तिने मला खूप सपोर्टही केला. एलिनच्या मृत्यूनंतरही मी काही काळ या गाडीतून फिरत होतो. नंतर मात्र गाडी विकून मी विमानाने प्रवास करायला लागलो.

तुम्ही प्रकाशचित्रणाचा विषय म्हणून पक्षी का निवडलेत? पक्षी तुम्हाला इतकी भुरळ का घालतात? पक्षांचे प्रकाशचित्रण कसे सुरू केलेत?
पक्षी खरोखरच फार सुंदर असतात. त्यांचं सगळं आयुष्य अगदी आश्चर्यकारक म्हणावे असे वाटते. हजारो किलोमीटरचा प्रवास ते लीलया पार पाडतात. त्यांचे रंग, पिसारा, हालचाल सगळेच मनाला भुरळ पाडणारे असते. वेगवेगळ्या ऋतुंमध्ये त्यांचा पिसारा बदलत जातो. मला विशेष करून पाणथळीतले, समुद्रकिनार्यावरचे पक्षी जास्त आवडतात.


'बर्ड अॅज आर्ट', मुलाखत - ऑर्थर मोरीस, फ्लोरीडा, युएस

पक्षांचे प्रकाशचित्रण करायचे असे ठरवल्यावर मी माझ्या कॅनन AE-1 कॅमेर्यासाठी कॅनन ४००मिमी F/4.5 ED ही लेन्स घेतली. मी काढलेले सुरूवातीचे पक्षांचे फोटो खरंच अगदीच खराब होते. पक्ष्यांच्या जागी नुसते ठिपकेच होते. कुणाला दाखवले तर पक्षी शोधावे लागतील इतके छोटे दिसत होते.

पक्षांचे चित्रिकरण करायचे तर त्यांच्याबद्दल व्यवस्थित माहिती असायला हवी. तुम्ही पक्षी ओळख, त्यांच्या सवयी, आवाज याची माहिती होण्यासाठी काय करता?
आधी म्हटल्याप्रमाणे मी प्रकाशचित्रण करायच्या अगोदरही सुमारे सात वर्षे पक्षी निरीक्षण करायचो. त्यावेळी, आणि अजुनही मी पक्षांविषयी खूप वाचन करतो. त्यांच्या माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल तज्ज्ञांना श्न विचारून, वाचन करून माहिती करून घेतो. अजुनही प्रकाशचित्रणासाठी फिल्डवर गेल्यावर ज्या पक्ष्यांचे चित्रण करायचे आहे त्यांची माहिती असणे मला आवश्यक वाटते.

सगळे 'पक्षी प्रकाशचित्रण' असे म्हणत असताना तुम्ही 'बर्ड अॅज आर्ट' असे म्हणत पक्षी प्रकाशचित्रणाला केवळ नोंद करण्याच्या साधनापेक्षा जास्त असा कलेचा दर्जा देता. त्याबद्दल अजून काही सांगाल का?
मी आजवर केवळ मला आनंद देणारे चित्रण करत आलो आहे. मला स्वच्छ, गर्दी-गिचमिड नसलेले, टाईट कंपोझिशन असलेले शार्प फोटो काढायला खूप आवडतात. गिचमिड नसलेली, सुरेख एकसारखी पण पक्ष्याच्या चित्राला पूरक अशी बॅकग्राऊंड ठेवायला आवडते. एखादा पक्ष्यांचा थवा दिसला तर मी पक्ष्यांच्या सहनिवासासह त्याचे प्रकाशचित्रण करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळते. वेगळ्या प्रकारचे ब्लर फ़ोटो काढायला, नवीन प्रयोग करून बघायलाही मला खूप मजा येते.

'बर्ड अॅज आर्ट' हा शब्दप्रयोग पहिल्यांदा माझी पत्नी एलिन हिने वापरला. आम्ही आमच्या व्यवसायाच्या नावाविषयी चर्चा करत होतो आणि अचानक तिने हा शब्दप्रयोग केला.


'बर्ड अॅज आर्ट', मुलाखत - ऑर्थर मोरीस, फ्लोरीडा, युएस

तो ऐकल्याबरोबर मला खूपच आवडला आणि आम्ही तेच नाव आमच्या प्रकाशचित्रणाच्या व्यवसायासाठी वापरायचे ठरवले. आज कॅन्सरसारख्या आजारामुळे ती आमच्यात नसली तरी या नावाने तिचे अस्तित्व अजून आहे असे मला वाटत रहाते.

फिल्म प्रकाशचित्रणाकडून डिजिटल प्रकाशचित्रणाकडे जाताना तुम्हाला काय वाटलं? तुमच्यासाठी हा खूप मोठा बदल होता का? आता डिजीटल प्रकाशचित्रणाविषयी तुमचे काय मत आहे?
मी खरंतर डिजिटल प्रकाशचित्रणाकडे वळणारच नव्हतो. पण हिस्टोग्राम शिकण्यासाठी म्हणून मी कॅनन EOS 1-D विकत घेतला. तो वापरून बघितल्यावर मात्र मला खूपच आवडला. डिजीटलकडे वळणे हा माझ्यासाठी खूप मोठा बदल होता. खूप शिकायला लागलं. मला फोटोशॉप या शब्दाची चक्क भिती वाटायची!! आता मात्र असं वाटतं की फिल्म हा शब्द मी ऐकलाच नसता तरी चाललं असतं!!

तुम्ही बरेच फोटोग्राफी वर्कशॉप घेता, फोटो टूर नेता. त्याविषयी ऐकायला आवडेल. त्याचे प्लानिंग कसे करता? फिल्डवर इतर फोटोग्राफरना तुम्ही कसे शिकवता आणि मदत करता?
या टूरसाठी बरेच काम करावे लागते पण फोटोग्राफी अधिक वरच्या पातळीला नेण्यासाठी त्या खरोखरच खूप फायद्याच्या असतात. इतक्या वर्षात मी अनेक नवीन मित्र बनवले जे अजूनही माझ्याबरोबर टूरसाठी येत असतात.

मी वर्षानुवर्ष बर्याच स्थळांवर पुन्हापुन्हा जात असतो. मेक्सिकोमधले Bosque del Apache NWR , दक्षिण फ्लोरिडा या अशा जागा आहेत की तिथे प्रत्येकवेळी प्रकाशचित्रणाच्या नव्या संधी उपलब्ध असतात. अलिकडच्या काही वर्षात मात्र मी नव्या जागी सुद्धा जातोय. माझी मैत्रिण डेनिस इपोलीतो हिच्या बरोबर काही टूर एकत्रही


'बर्ड अॅज आर्ट', मुलाखत - ऑर्थर मोरीस, फ्लोरीडा, युएस

नेतो. तिच्यामुळे मला फ्लावर फोटोग्राफी आणि HDR फोटोग्राफी यात रस निर्माण झाला आहे. तिची क्रिएटीविटी खूपच छान आहे. तिचे काम तुम्हाला http://deniseippolito.com/ इथे पहाता येईल.

या टूरवर जे फोटोग्राफर येतात त्यांना मी बर्याच प्रकारे मदत करतो. नवीन फोटोग्राफरना आमच्याबरोबर फोटो काढायला खूप मजा येतेच आणि अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. प्रकाश, वारा, वातावरण हे प्रकाशचित्रांवर कसा परिणाम करते याबद्दल त्यांना शिकता येते. इमेज डिझायनिंग, कंपोझिशन याबद्दल शिकता येते. त्यांची क्रिएटिविटी वाढते. आम्हाला काम करताना बघण्याचा, आमचे बेस्ट फोटो सिलेक्ट करण्याच्या प्रोसेसचा त्यांना नक्कीच फायदा होतो.

निसर्ग प्रकाशचित्रण करताना प्रकाश, वातावरण यांचा खरंच काही भरवसा देता येत नाही. ते सतत बदलत असते. अशावेळी तुम्ही टूरवर, फिल्डवर काय करता?
आजपर्यंत नशिबाने बहुतेकवेळा मला अशा खराब वातावरणाचा त्रास झालेला नाही. क्वचित जेव्हा खूप पाऊस वगैरे कोसळत असतो त्यावेळी आम्ही त्या वेळाचा फायदा करून घेत हॉटेलमध्ये लेक्चर्स घेतो किंवा इनडोअर फोटोग्राफी सेशन घेतो.

तुमची प्रकाशचित्रणासाठी आणि टूर नेण्यासाठी आवडती ठिकाणे कोणती?
पूर्व आफ्रिका, दक्षिणेकडचे समुद्री भाग, सॅन दिएगो, न्यूयॉर्कमधले जमाईका बे वाइल्ड लाईफ रिफ्युज, Bosque del Apache NWR , गॅलापागोज ही सगळीच माझी आवडती ठिकाणे आहेत.


'बर्ड अॅज आर्ट', मुलाखत - ऑर्थर मोरीस, फ्लोरीडा, युएस

प्रकाशचित्रणासाठी फिरताना तुम्हाला नक्कीच काही विशेष अनुभव आले असतील. त्यातले काही मोजके अनुभव वाचायला खूप आवडेल. फोटोग्राफीसाठी फिरताना एखादा जिवावर बेतणारा प्रसंग घडला आहे का?
खरंतर खूप अनुभव आहेत. ते सगळे इथे देणे खरंच शक्य नाही. मी नेहेमीच मला आलेले अनुभव माझ्या ब्लॉग वर www.BIRDSASART-Blog.com इथे लिहीत असतो. इथे वाचून संपणार नाहीत इतके अनुभव तुम्हाला वाचायला मिळतील. प्रत्यके ब्लॉग पोस्ट मध्ये नवीन काहितरी शिकायला, नवीन काहितरी अनुभवायला मिळेल याची मला नक्कीच खात्री आहे.

जिवावर बेतणारा प्रसंग फारसा नाही आला. मात्र इथे या लिंकवर एक विडीयो बघता येईल.

इतक्या विविध ठिकाणी फिरताना तुम्हाला काय वाटलं. कसे अनुभव आले?
मी खूप वेगवेगळ्या देशात फ़िरलो. तिथले अनुभव घेतले. त्या त्या जागेतले खाद्यपदार्थ चाखून पाहिले. हे सगळे करायला खरंच खूप छान वाटते. या प्रवासात नवनवीन लोकांना भेटायला मिळतं, नवीन पक्षी, प्राणी यांचे प्रकाशचित्रण करता येते जे माझ्यासाठी खूपच महत्वाचे आहे.

पक्षी प्रकाशचित्रण हे लोकांमध्ये पक्षी संवर्धनाबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी उपयोगी आहे असे वाटते का?
नक्कीच. पक्षांचे सुंदर फोटो पाहून लोकांना पक्षांचे, त्यांच्या सहनिवासाचे रक्षण करावे, त्यासाठी काहितरी करावे असे नक्कीच वाटते असा माझा अनुभव आहे.


'बर्ड अॅज आर्ट', मुलाखत - ऑर्थर मोरीस, फ्लोरीडा, युएस

भारतातही अनेक प्रकारचे पक्षी, वन्यजीव दिसतात. कधी भारतात येऊन प्रकाशचित्रण करायचा विचार आहे का?
अजूनपर्यंत कधी भारतात आलो नाहीये. मात्र मरण्यापूर्वी एकदातरी भारतात येऊन प्रकाशचित्रण करायची मनापासून इच्छा आहे.

या क्षेत्रात नवीन असणाऱ्या पक्षी प्रकाशचित्रकारांना तुम्हाला काय सांगावेसे वाटते?
खाली वाकून, अगदी हलकेच पक्षांना त्रास न देता त्यांच्याजवळ जायचा प्रयत्न करा. जे तुम्हाला आवडते त्याचेच चित्रण करायचा प्रयत्न करा. आणि मोठमोठ्या प्रकाशचित्रकारांनी काढलेले फोटो बघून त्यातून काहितरी नवीन शिकण्याचा सतत प्रयत्न करत रहा.

ऑर्थर मोरीस
फ्लोरीडा, अमेरीका.
www.birdsasart.com
www.BIRDSASART-Blog.com


'बर्ड अॅज आर्ट', मुलाखत - ऑर्थर मोरीस, फ्लोरीडा, युएस


'बर्ड अॅज आर्ट', मुलाखत - ऑर्थर मोरीस, फ्लोरीडा, युएस


'बर्ड अॅज आर्ट', मुलाखत - ऑर्थर मोरीस, फ्लोरीडा, युएस


मागील लेख पुढील लेख