1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे जीवन !

किशोर साळी

अनुवाद - सायली घोटीकर


प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे जीवन ! किशोर साळी

कल्पना करा, की रोज सकाळी आपण फक्त उठतोय, काही करत नाही. महिनोन महिने तेच चाललंय. काहीच नवीन घडत नाही. कसली आशा नाही, नवीन काही मिळवणं नाही किंवा काही आव्हानंही नाहीत. कित्ती कंटाळवाणं होऊन जाईल आयुष्य! जॉन सी. मक्स्वेल म्हणतात, "आपण जर प्रगती करत असलो, तर आपण नक्कीच आपल्या सुरक्षित कवचातून बाहेर पडलेलो असतो." सुरक्षित जगातून बाहेर पडणं म्हणजे नवी आव्हानं स्वीकारणं. पण आव्हानांबरोबर हार-जीत येतेच. काही मिळवण्याआधीची एक पायरी म्हणजे ‘हरणे’. नवजात बाळही या जगात येताना हसण्याआधी पहिल्यांदा रडतं, ते यासाठीच असावं.

दिवाळी हा प्रकाशाचा सण! आणि प्रकाश म्हणजे आनंद. आपण आयुष्यात आनंद आणण्यासाठी कायम झटत असलो, तरीही दु:खाच्या काळोख्या रस्त्यावरून चालल्याशिवाय आनंदाचे प्रकाशमान शिखर आपण गाठूच शकत नाही हे लक्षात ठेवलंच पाहिजे. दिवाळीतल्या परंपरेला अनुसरून नरकचतुर्दशीला नरकासुराला मारण्याचा संकेत आहे. यासाठी प्रतिकात्मकरीत्या 'कारिट' ही फळे पायाखाली चिरडली जातात आणि त्याचा कडू रस प्यायला जातो.(हा रस म्हणजे नरकासुराच्या रक्ताचे प्रतिक आहे असे मानले जाते.)

असा दु:खाचा किंवा वाईट गोष्टींचा नायनाट केला, की मगच दिवाळीच्या गोडधोडाचा आनंद लुटला जातो. तसंच आनंदाची परिभाषा म्हणजे 'उजेड'. प्रकाश हा सावलीशिवाय, म्हणजेच 'दु:खा'शिवाय, पूर्ण होऊच शकत नाही. वेगळ्या शब्दांत म्हणायचं, तर काळोख असेल तरच उजेडाचे महत्व असते. सख्ख्या शेजाऱ्यांप्रमाणे हे दोघं एकमेकांजवळ नांदतात. छाया आणि प्रकाश हेच तर आयुष्याचे सौंदर्य आहे, आणि नेमके तेच एखाद्या कलात्मक प्रकाशचित्राला सौंदर्य बहाल करते.

फोटोग्राफी किंवा प्रकाशचित्रण याचा शब्दश: अर्थ म्हणजे "प्रकाशाने लेखन". पण हे प्रकाशलेखन करण्यासाठी प्रकाशचित्रकाराला आधी अंधाराचाच आधार घ्यावा लागतो.


प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे जीवन !किशोर साळी

कॅमेराच्या आत कधीच प्रकाश नसतो. त्या अंधारातूनच प्रकाशाचे लेखन शक्य होते. फोटोग्राफी आपल्याला एखाद्या दु:खी चेहऱ्यावर आनंदाची लकेर पसरवण्याची शक्ती देऊन जाते. एखाद्या काळ्या, अंधाऱ्या जागेत हे प्रकाशलेखन करणं मला रडक्या चेहऱ्यावर हास्य पसरवण्याचा एक वेगळाच निर्मितीआनंद देते.

प्रत्येक फोटो हा छाया आणि प्रकाशाचा खेळ असतो तसंच आयुष्य हे ही आनंद आणि दु:ख यांचा आगळा वेगळा मेळ असते. आणि म्हणुनच 'जिंदगी है धूप और छांव का खेळ' किंवा 'जीवन - एक खेळ ऊन सावलीचा' या विचारावर आधारीत फोटोंची ही छोटी मालिका.


प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे जीवन !किशोर साळी


प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे जीवन !किशोर साळी


प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे जीवन !किशोर साळी

To Read in English मागील लेख पुढील लेख