1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

खगोलीय प्रकाशचित्रण

निलेश देसाई, पुणे
खगोलीय प्रकाशचित्रण


खगोलीय प्रकाशचित्रण निलेश देसाई, पुणे

मला शालेय जीवनापासूनच आकाशात दिसणाऱ्या तार्यांविषयी कुतूहल वाटत आले आहे. त्यातूनच मी खगोलशास्त्र या विषयाचा अभ्यास सुरू केला. माझ्या या प्रवासातले महत्त्वाचे वळण म्हणजे खगोल मंडळाशी झालेली माझी ओळख. तिथे मला बरेच हौशी खगोल अभ्यासक आणि अतिशय मनोवेधक अशी व्यक्तिमत्त्वे भेटली, ज्यांनी केवळ माझ्या छंदावरच नव्हे, तर जीवनावरही प्रभाव टाकला.

माझ्या वडिलांनी माझी आवड बघून आणि माझ्या हट्टाला नमून एक ५"ची दुर्बीण घेऊन दिली. त्यावेळी मला दुर्बीण हाताळण्याचा फारसा अनुभव नव्हता. दुर्बीण घरी आणताच त्यातून मी पाहिलेली पहिली खगोलीय वस्तू म्हणजे शनी ग्रह! ते दृष्य अर्थातच माझ्यासाठी अविस्मरणीय होते. खगोलीय वस्तूंमधील सौंदर्याने मला आजतागायत या विषयाला बांधून ठेवले आहे.

खगोल शास्त्रावरील पुस्तके, ग्रंथ अथवा मासिके यांतून प्रसिद्ध होणारी प्रकाशचित्रे ही नक्कीच दुर्बिणीतून दिसणाऱ्या दृष्यांपेक्षा जास्त मनोवेधक असतात. ती बघून मलाही खगोलीय वस्तूंची प्रकाशचित्रे टिपण्याचा ध्यास लागला होता. १९९७मध्ये मी पहिल्यांदाच माझ्या चित्रकलेच्या सरांचा nikon FM १० कॅमेरा वापरून त्यावेळी आकाशात दिसत असलेल्या धूमकेतूचे प्रकाशचित्रण केले. हा प्रयोग थोडाफार यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मी २००३ मध्ये स्वस्तात उपलब्ध असलेल्या वेबकॅममधून मंगळ ग्रहाचे प्रकाशचित्रण केले. त्यात मी मंगळावरील ध्रुवीय बर्फ छायाचित्रित करू शकलो. खगोलीय वस्तूंचे प्रकाशचित्रण करण्यासाठी कुशलतेबरोबरच विविध विशेष साधनांची आवश्यकता असते. ही साधने बरीच खर्चिकही असतात.


खगोलीय प्रकाशचित्रण निलेश देसाई, पुणे

खगोलीय प्रकाशचित्रण हा तसा बराच मोठा विषय आहे आणि त्यात अनेक उपप्रकार येतात. प्रत्येक उपप्रकारापामाणे त्याला लागणारी साधनसामुग्री बदलते. मी या साधनसामग्रीविषयीची माहिती गोळा करण्यात भरपूर वेळ घालवला आणि संधी मिळताच बरीच साधने गोळाही केली.

पण या विषयात तुम्ही जेवढे काम कराल तितके नवीन अनुभव येत जातात आणि नवीन साधनसामुग्रीची गरज भासू लागते. आधी कुशल आणि उच्च प्रतीची साधने मिळवणे आणि नंतर ती हाताळण्याची कुशलता आत्मसात करणे या सर्कशीत मला खूप वेळ घालवावा लागला आहे.

शहरातील रोषणाईपुढे आकाशातले तारे फिकट पडतात. त्यामुळे प्रकाशचित्रणासाठी शहरापासून जास्तीत जास्त लांब जावे लागते. चांगल्या आकाशाची उपलब्धता पुण्याजवळ जास्त असल्यामुळे मी मुंबई सोडून पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मी ज्या प्रकारचे प्रकाशचित्रण करतो त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे वजन १५० किलोच्या आसपास आहे. पुण्यापासून कमीत कमी ३०-४० किलोमीटर अंतरावर प्रकाशचित्रे टिपता येतील इतपत काळे आकाश मिळते. अंतराव्यतिरिक्त इतर अनेक मुद्दे आकाशाची प्रकाशचित्रणासाठीची पात्रता ठरवितात. उदाहरणार्थ चंद्राची कला, आकाशाची निरभ्रता, आर्द्रता, वारा इत्यादी.


खगोलीय प्रकाशचित्रण निलेश देसाई, पुणे

नेहमीच सुट्टीच्या दिवशी चांगले आकाश मिळण्याची शक्यता बहुधा कमीच असते. बऱ्याचदा कचेरीतून काम लवकर संपवून आम्ही सर्व सामान गाडीत भरून प्रकाशचित्रणासाठी निघतो. अवजड उपकरणे गाडीत भरणे आणि उतरवणे यात बराच वेळ आणि ऊर्जा वाया जाते. पण असे असूनही अशा कार्यक्रमांसाठी निघताना एक वेगळाच आनंद होतो! मात्र कधीकधी आख्खी रात्र घालवून सुद्धा चांगली प्रकाशचित्रे मिळतातच असेही नाही! या सर्व प्रकाशचित्रांवर फोटोशॉप वगैरे सारख्या संगणक प्रणाली वापरून संस्कार करावे लागतात. यात सहज ४-५ तास निघून जातात.

अनेकांना, अगदी माझ्या आई-वडिलांना सुद्धा हा सगळा व्याप करण्यामागचे माझे कारण उमजलेच नाही. अनेकांनी मला वेड्यात काढले. पण तो रात्रीचा घाटातला प्रवास, चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली जंगलात थंड वाऱ्यावर बसण्याचा अनुभव, अवकाशातल्या ताऱ्यांच्या छबी टिपण्याचा अनुभव हे सगळेच विलक्षण आहे.

प्रकाशचित्रण संपवून सकाळी परत येताना अनेक सुखद अनुभव येतात. धुक्यात हरवलेले रस्ते, त्यात नाचणारे पक्षी आणि हळूहळू डोके वर काढणारी सूर्याची किरणे एक वेगळाच आल्हाददायक अनुभव देऊन जातात. त्यातून चांगली प्रकाशचित्रे मिळालीच तर झालेल्या पाठदुखीचा आणि हरवलेल्या झोपेचा पूर्ण विसर पडतो आणि पुढील अनेक दिवस एक उत्साह वाटत राहतो.

खगोल प्रकाशचित्रण हा विषय माझ्यासाठी खरोखरच छंदापेक्षाही मोठा आहे!


खगोलीय प्रकाशचित्रण निलेश देसाई, पुणे

धुमकेतू Lovejoy : हे छायाचित्रण कॅनोन ७ D कॅमेरा आणि कॅनोन ४०० F ५.६ या लेन्सने ३ मिनिटांत केलेले आहे. धूमकेतू एका विशिष्ट वेगाने सूर्याभोवती प्रदक्षिणा घलतो. धूमकेतूची स्थिती तार्यांसापेक्ष वेळेनुसार बदलत असते. काही मिनिटात धूमकेतूची जागा बदललेली दिसते. म्हणून हे छायाचित्र घेण्यासाठी मी धूमकेतूच्या वेगाने कॅमेरा फिरेल अशाप्रकारे व्यवस्था केली होती. त्यामुळे बाकीचे तारे जरा लांबट आकाराचे दिसतात.


खगोलीय प्रकाशचित्रण निलेश देसाई, पुणे


खगोलीय प्रकाशचित्रण निलेश देसाई, पुणे

To Read in English मागील लेख पुढील लेख