1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता !

इंद्रनील मुखर्जी
आंतरराष्ट्रीय दर्जाचे फोटोग्राफर असलेले इंद्रनील मुखर्जी हे सुप्रसिद्ध स्पोर्ट्स फोटोग्राफर आहेत. त्यांनी ऑलिम्पिक सारख्या मोठ्या खेळांच्या स्पर्धासाठी अनेकवेळा प्रकाशचित्रण केले आहे.

अनुवाद - स्वप्नाली मठकर


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटोजर्नालिझममधल्या नीतिमत्तेसंबंधात प्रकाशचित्रकार काय करतात किंवा काय करू शकतात याचा हा ऊहापोह! विषयाच्या सुलभीकरणासाठी फोटोग्राफीमधल्या किंवा प्रकाशचित्र-पत्रकारीतेमधल्या नीतीविषयक मूल्यांची ढोबळमानाने दोन भागात विभागणी करू. एक म्हणजे फोटो काढताना फोटोग्राफरनेच विषयासंबंधी, आजूबाजूच्या वातावरणासंबधी बाळगलेले तारतम्य. आणि दुसरे म्हणजे फोटो काढून त्याचे पोस्टप्रोसेसिंग करताना बाळगलेले तारतम्य असे म्हणता येईल.

पण खरं सांगायचं, तर आजच्या काळात, जेव्हा इवेण्ट ऑर्गनायझर किंवा इतर सहकारी एखाद्या वातावरणाची मुद्दाम निर्मिती करून फोटो काढत असतात, तेव्हा आपण त्यापासून कसे आणि कितपत दूर राहू शकतो हा एक तिसरा पैलूही नीतिमत्तेविषयी बोलताना महत्वाचा ठरू शकतो. कधीतरी तुम्ही फोटोग्राफर म्हणून एखाद्या घटनेच्या स्थळी जाता आणि तुमच्या लक्षात येतं की सगळेजण फोटोग्राफरला फोटो काढायला योग्य संधी देत मुद्दाम वातावरणनिर्मिती करत आहेत, आजूबाजूचे हौशेगवशेही आपल्या मोबाईलमधल्या हाय रिझोल्युशनच्या कॅमेऱ्याने फोटो काढून, त्यावरचेच स्पेशल अॅप्स वापरून, फोटो हवे तसे बदलून, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मिडियावर टाकत आहेत. त्याच वेळी तुम्ही काढलेले वास्तववादी फोटो अगदीच फिके पडत आहेत. अशावेळी आपल्या कॅमेऱ्याने इतिहासाची नोंद करून ठेवताना या क्षेत्रातील नीतिमत्ता किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येईल.

तसं पाहता प्रकाशचित्र-पत्रकारही इतर लेखक/पत्रकारांसारखेच नैतिक मूल्ये आणि त्यावर आधारित अलिखित नियमांना बांधील असतात. प्रत्येक संस्थेची एक लिखित किंवा अलिखित नियमावली असते आणि त्या आधारे प्रकाशचित्रांमध्ये कुठली गोष्ट चालेल, काय चालणार नाही यांचे आराखडे ठरवलेले असतात. या नियमांमध्ये फोटोग्राफरने एखाद्या विशिष्ट घटनेच्या वेळी कसे वागावे, काय करू नये, कुठल्या गोष्टींना चित्रित करू नये, फोटो डिजीटली कितपत बदलला तर चालेल अशा अनेक गोष्टी असतात आणि कालपरत्त्वे त्यात सतत बदलही घडत असतो. मात्र ही नियमरेखा कधीकधी अस्पष्ट असते आणि त्यामुळेच कुठल्या गोष्टीने सत्याचा विपर्यास होईल हे ठरवणे कठीण जाते! AFP या ग्लोबल न्यूज एजन्सीमध्येही आम्हा फोटोग्राफर्ससाठी कठोर नियमावली आहे आणि सगळ्याच फोटोग्राफर्सना ती पाळावीच लागते.

ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या व्याख्येनुसार नीतिमत्ता म्हणजे
"ethics (noun)” as, “Moral principles that govern a person’s behavior or the conducting of an activity: medical ethics also enter into the question' and lists synonyms as 'moral code, morals, morality, moral stand, moral principles, moral values, rights and wrongs, principles, ideals, creed, credo, ethos, rules of conduct, standards (of behavior), virtues, dictates of conscience' [1]


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटोग्राफ हे आपल्या संस्कृतीचे आणि इतिहासाचेही महत्त्वपूर्ण घटक आहेत. एकोणीसाव्या शतकात लहानाचे मोठे झालेल्या व्यक्तींसाठी कटू स्मृतींचे स्मरण करून देणारे हे दोन फोटो म्हणजे इतिहासातले एक काळे पान म्हणावे लागेल.

फोटो १ : सायगोन येथे भर रस्त्यात झालेले हत्याकांड
(प्रकाशचित्रकार - एडी अॅडम्स - Eddie Adams)


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटो २: नापाम बॉम्बच्या हल्ल्यानंतर रस्त्यातून धावत जाणारी लहान नग्न मुलगी
(प्रकाशचित्रकार - निक अट - Nick Ut)

तसाच आणखी एक फोटो म्हणजे गोध्रा दंगलीमधला आर्को दत्ता यांनी टिपलेला कुतुबुद्दीन अन्सारी याचा फोटो. हा फोटो इतका प्रसिद्ध झाला की त्या पायी अन्सारी याला आपले राहते शहर दोन वेळा बदलावे लागले. म्हणूनच फोटोग्राफर हे इतिहासाचे साक्षीदार आहेत असे म्हणायला हवे.

दुर्दैवाने भारतासारख्या देशात, जिथे मोठ्या प्रमाणावर फोटोग्राफिक विषय उपलब्ध आहेत, जिथे सतत काही ना काही घडत असते, अशा देशात अशा बातम्या आणि फोटोग्राफीसंबंधातले नियम बनवणारी, त्यावर अंकुश ठेवणारी एकही राष्ट्रीय पातळीवरची संस्था नाही की असे नियमही अस्तित्वात नाहीत.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

NPPA (The National Press Photographers Association) यांनी तयार केलेली आणि जगभरात मान्यता पावलेली एक नियमावली इथे देत आहे [२] या नियमावलीनुसार प्रेस फोटोग्राफीमध्ये खालील गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.
१) विषयाची अचूकपणे मांडणी गरजेची.
२) मुद्दाम वातावरण, पात्रनिर्मिती करून फेरफार करू नये.
३) साचेबंद ठोकताळे, तुमचा कल इत्यादी टाळून योग्य संदर्भासह पूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचू द्या.
४) विषय किंवा व्यक्ती यांचा विचार करून फोटो काढा.
५) तुमच्या फोटोतल्या व्यक्ती अथवा विषयांवर तुमचे आचारविचार लादू नका.
६) फोटो एडिटिंग केल्यावर त्यातून चुकीचा अन्वयार्थ निघता कामा नये.
७) प्रेस फोटोग्राफीमध्ये फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीला फोटो काढू दिल्याबद्दल मोबदला देऊ नका.
८) फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती किंवा फोटोशी संबंधित कोणाही व्यक्तीकडून भेट स्वीकारू नका.
९) दुसऱ्या पत्रकारांच्या कामात मुद्दामहून ढवळाढवळ करू नका.

ही नऊ मार्गदर्शक तत्त्वे NPPA च्या सभासदांनाच नाही तर सर्वच प्रकाशचित्रकारांना एक प्रकारे आराखडा आखून देतात. या तत्त्वांबरोबरच एक प्रस्तावना आणि सात आदर्श यांची सांगड घालून फोटोजर्नालिझममधून NPPA च्या काय अपेक्षा आहेत हे ही सांगितलं गेलं आहे.

उद्दिष्ट - फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता हा तसा कठीण विषय आहे. याबद्दल विचार करता काही प्रश्न मनात येणे साहाजिक आहे. एखाद्या फोटोसाठी फोटोग्राफर व्यक्तीला पोझ घ्यायला सांगू शकतो का? फोटोशॉप किंवा डार्करूममध्ये फोटो एडीट केलेले चालणार आहेत का? फोटोत काही बदल केले तर चालणार का? असे अनेक प्रश्न फोटोग्राफरला पडत असतात किंवा पडू शकतात. आज या लेखाद्वारे आणि जुन्या फोटोग्राफ्सच्या माध्यमातून मी या कठीण विषयाबद्दल लिहित या प्रश्नांना हात घालतोय.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटो ३: इवो जिमा - (प्रकाशचित्रकार - जो रोसेन्थल - Joe Rosenthal)

मतभेद आणि वाद -
काही फोटो ते काढल्यापासूनच (कधी कधी उगीचही) वादविवादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 'इवोजिमा' हा फोटो फोटोग्राफरने मुद्दाम पोझ घेऊन काढला असा आरोप केला गेला आहे. मिडीया डिपार्टमेण्टच्या एका जर्नलमध्ये असे लिहीले गेलेय की 'असोसिएटेड फोटोग्राफर, जो रोसेन्थल याने दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास, सुरिबाची या इवोजीमा बेटावरील जपानी टेहळणी चौकीजवळ तीन फोटो काढले. त्याच्या तिसऱ्या फोटोकडे पाहून असे वाटते की त्याचा पहिला फोटो हा मुद्दाम पोझ घेऊन ठरवून काढला असावा. या पहिल्या फोटोत सहा अमेरिकन सैनिक अमेरिकेचा राष्ट्रध्वज फडकवताना दिसत आहेत, तर तिसऱ्या फोटोत अठरा सैनिक कॅमेराकडे पाहून हसत, हात हलवत आहेत.' हा वाद होण्यामागचे कारण म्हणजे रोसेन्थल याने ग्वाम येथे एका पत्रकाराच्या प्रश्नावर बोलताना दिलेले गोंधळात टाकणारे उत्तर! त्या पत्रकाराने रोसेन्थलच्या पहिल्या फोटोबद्दल त्याचे अभिनंदन केले आणि विचारले की हा फोटो ठरवून काढलेला आहे का? त्यावेळेस रोसेन्थलला पत्रकार तिसऱ्या फोटोबद्दल बोलत आहे असे वाटून त्याने होकारार्थी उत्तर दिले आणि आरोपांचा आरंभ झाला.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटो ४: द फॉलिंग सोल्जर (प्रकाशचित्रकार - रॉबर्ट कापा- Robert Capa)

दुसरा असाच वादंग निर्माण करणारा, ५ सप्टेंबर १९३६ साली टिपला गेलेला फोटो म्हणजे 'द फॉलिंग सोल्जर' हा फोटो. गेली अनेक वर्षे हा फोटो म्हणजे स्पेनच्या युद्धात रिपब्लिकनच्या (Iberian Federation of Libertarian Youth (FIJL) soldier) मृत्यूचे प्रतिक मानला जातोय. या फोटोवरही तो मुद्दाम पोझ घेऊन, मुद्दाम ठरवून काढला आहे असा आरोप आहे. आज हा फोटो विसाव्या शतकातील इतिहासातली एक महत्वाची नोंद मानला जातो.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

डिजीटल क्रांती आणि फोटोतले बदल -
पूर्वी फोटोग्राफी जेव्हा फिल्मवर केली जायची त्या काळातही डार्करूममध्ये फोटोत काही बदल केले जायचेच. तेव्हाही काय करावे आणि करू नये याचे नियम असले तरी प्रिंट करताना काही वेळेस कळत नकळत मर्यादेचे उल्लंघन व्हायचे आणि ते मानवी चुकांच्या नावाखाली कधी कधी खपूनही जायचे.

मात्र आता नवीन डिजिटल कॅमेरामुळे डिजिटल बदल करणे सोपे झाले आहे. पत्रकारिता संस्था आपल्या नियमांबाबत काळजी घेत असल्या तरी अशा मर्यादा ओलांडल्या जातातच. १९८२ साली Scitex digitizerचा वापर करत नॅशनल जिओग्राफिक या मासिकाने दोन प्रकाशचित्रे बदलून या मर्यादा ओलांडल्या. आपल्या अंकाच्या मुखपृष्ठावर शोभेल आणि योग्य प्रकारे मावेल असे बदल करत पिरामिडच्या चित्रात बदल करून पिरामिड स्क्वीझ करून दाखवले गेले.

फोटो ५: पिरामिड मूळ चित्र (प्रकाशचित्र - गोर्डन गॅहन - GORDON GAHAN)


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

अजून काही बदलली गेलेली प्रसिद्ध प्रकाशचित्रे:
१९९४ साली ओ. जे. सिम्पसन याच्या खटल्याच्या वेळेस टाइम मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर लावलेल्या बदल केलेल्या प्रकाशचित्रामुळे फोटोला एक वेगळे परिमाण मिळाले. त्याच वेळेस न्यूजविक या मासिकाने मात्र बदल न केलेले चित्र आपल्या मुखपृष्ठावर वापरले होते.

फोटो ६: टाइम मासिक व न्यूजविक मासिक यांची मुखपृष्ठे (चित्रसंदर्भ बघा)


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटो ७: (प्रकाशचित्र - जॉन पॉल फिलो - John Paul Filo)

१९७० सालच्या केंट स्टेट येथील घटनेतल्या रडणाऱ्या स्त्रीच्या मागचा एक खांब या प्रकाशचित्रात काढून टाकला आहे.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटो ८: हेसिडीक न्यूजपेपरने बदललेली हिलरी क्लिंटन यांची इमेज (चित्रसंदर्भ बघा)


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटो ९: अल अहरम न्यूजपेपरने बदललेली होस्नी मुबारक यांची इमेज (चित्रसंदर्भ बघा)

नैतिकमूल्यांची बंधने -
नियम कितपत ताणायचे?
तुमचे उद्दिष्ट काय यावर कितपत बदल चालतील हे ठरेल. आपल्या फोटोद्वारे जगातले सौंदर्य आणि चांगल्या गोष्टीच दाखवायच्या असतील तर बदल ठीक आहेत. पण जर सत्य आणि खरे आयुष्य दाखवायचे असेल तर मात्र नाही. इथे प्रश्न येतो तो तत्त्वांचा. कारण अशा प्रकाशचित्रांमधून सौंदर्य दाखवणे हा माझा उद्देश नसतोच. फोटोजर्नालिझममध्ये प्रकाशचित्राद्वारे इतिहासाची योग्य नोंद हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे त्याच्या सौंदर्यस्थळांचा किंवा ते चित्र कसे अधिक अपिलिंग होईल याचा विचार करता येत नाही.

नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी आणि कॅमेरामधून टिपलेल्या गोष्टी यात फरक आहे. लॉंग एक्स्पोजर, कमी प्रकाशातले प्रकाशचित्रण, नवीन तंत्राने शक्य झालेले अंधारातले प्रकाशचित्रण यामुळे नुसत्या डोळ्यांनी दिसत नसलेल्याही अनेक गोष्टी चित्रित करता येऊ शकतात. पण अश्या चित्रित केलेल्या काही गोष्टी अस्पष्ट असू शकतात. त्या नीट दिसण्यासाठी एका ठराविक मर्यादेपर्यंत केलेले बदल बहुतेक वेळा चालतात. पण तरीही हा निर्णय वैयक्तिक किंवा त्या-त्या संस्थेचा असू शकतो, शिवाय तो काळवेळानुसार बदलू शकतो. उदा. एखाद्या फुलावर पाण्याचे तुषार उडवून तो फोटो कॅलेंडरसाठी वापरणे वेगळे आणि तो फोटो पहिल्या पावसाचा शिडकावा म्हणून बातमीसाठी वापरणे वेगळे. दुसऱ्या प्रकारात चक्क फसवणूक आहे.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटो १०: ( प्रकाशचित्र - ब्रायन वाल्स्की-Brian Walski)

मार्च २००३मध्ये गल्फ वॉर-२च्या सुमारास लॉस एंजलीस टाइम्सच्या मुखपृष्ठावर एक फोटो छापला गेला होता. खरंतर हा फोटो म्हणजे दोन फोटोंचे एकत्रिकरण होते. ते लक्षात आल्यानंतर दोनच दिवसात ब्रायन वाल्स्की या फोटोग्राफरची उचलबांगडी झाली होती.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटो ११: आईसलँड Eyjafjallajökull ज्वालामुखी (चित्रसंदर्भ बघा)

२०१०मध्ये आईसलँड येथे झालेल्या Eyjafjallajökull [७] या ज्वालामुखी उद्रेकाची प्रकाशचित्रे एका न्यूज एजन्सीने दिली. सिडनी इथल्या सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वर्तमानपत्राच्या वेड ल्युब (Wade Laube) या फोटो एडिटरला या प्रकाशचित्रात एक प्रकाशचित्र खूपच वेगळे वाटले. याची अधिक चौकशी केल्यावर आणि फोटोग्राफरकडे विचारणा केल्यावर मूळ प्रकाशचित्र आणि बदललेले प्रकाशचित्र मिळाले. त्यावरून राखेचा ढग अधिक परिणामकारक आणि सुंदर दिसण्यासाठी प्रकाशचित्रकाराने त्यात बदल केले होते हे समोर आले. या घटनेबद्दल वेड ल्युब याने आपल्या ब्लॉगवरही लिहिले आहे.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटो १२: सिरियन फायटर (प्रकाशचित्र - नार्सिसो कॉन्त्रेरस - Narciso Contreras)

२९ सप्टें. २०१३मध्ये सिरिया येथील युद्धाच्या फोटोत एक योद्धा बंदुकीच्या गोळ्यांपासून वाचण्यासाठी आडोसा घेत असतानाचा फोटो घेतला आहे. मूळ फोटोत एक विडीओ कॅमेराही दिसला आहे. मात्र बदल केलेल्या फोटोत क्लोनिंग तंत्र वापरून हा कॅमेरा दिसेनासा केला आहे. मात्र यावेळी फोटोग्राफरने या बदलाबद्दल स्वत:हूनच कबुली दिली होती. हा फोटोग्राफर फ्रीलान्सर होता आणि या चित्राबद्दलही बरीच चर्चा झाली होती. या प्रकाशचित्रकाराशी न्यूजएजन्सीने संबंध तोडले.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटो १३: अदनान हाज या प्रकाशचित्रकाराच्या फोटोबद्दलचे वादंग (प्रकाशचित्र - अदनान हाज - Adnan Hajj)

गल्फ युद्धाच्या वेळच्या या दोन्ही फोटोंमध्ये अदनान हाज या प्रकाशचित्रकाराने बरेच बदल केले. त्यामुळे न्यूज एजन्सीने त्याचे सर्व फोटो त्यांच्या वेबसाईटवरून काढून टाकून त्याच्याशी संबंध तोडले.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

फोटो १४: एक स्त्री पुतळ्यापाशी जाऊन प्रार्थना करताना (प्रकाशचित्र - Emmanuel Dunand)

भावनांशी खेळणारा नैतिक पेच -
डिसेंबर, २०१२ मध्ये अमेरिकेतल्या (कनेक्टिकट) सँडी हूक्स शाळेत गोळीबार झाला. त्यानंतर रात्रीच्या वेळेस एक स्त्री तिथल्या पुतळ्यापाशी जाऊन प्रार्थना करतानाचा एक फोटो प्रकाशित झाला. या फोटोवरून खाजगीपणा जपण्याबाबत बरेच वादंग झाले. "What It Feels Like To Be Photographed In A Moment Of Grief" अशा नावाचा ब्लॉग लिहून फोटोजर्नालिझम मधल्या नीतिमत्ता, व्यक्तीचा खाजगीपणा जपण्याचा हक्क यावर बऱ्याच चर्चा झाल्या. या चर्चा त्या एएफपीच्या फोटोग्राफर Emmanuel Dunand याने काढलेल्या त्या स्त्रीच्या फोटोच्या अनुषंगानेच होत्या.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

जबाबदार पत्रकार -
काही वेळेस एखाद्या चित्राचा काही भाग किंवा पूर्ण चित्रच बातमीमध्ये देण्यासारखे नसते किंवा जनसामान्यांच्या भावना दुखावणारे असते. अशा वेळेस ते प्रकाशचित्र किंवा त्याचा भाग न दाखवणे हे जबाबदार पत्रकारितेचे लक्षण आहे.

फोटोजर्नालिझममधले नीतिनियम आणि काही घटना:
NPPA ने घालून दिलेले नियम दिसताना साधे, सोपे दिसले, तरी काही वेळा त्यांची अंमलबजावणी करणे मात्र कठीण होऊन बसते. प्रत्येक घटना वेगळी असते आणि नियम सरसकट सगळ्यांना लावणे फार कठीण होऊ शकते. अशा वेळी प्रत्येक संस्था, न्यूज ग्रुप यांचे स्वत:चे असे काही नियम असतात. पत्रकार बनताना या नीतिनियमांचा अभ्यास करणे खूप जरुरीचे आहे.

फोटो एडिटिंग:
फोटोत केलेले बदल कधी नियमांच्या बाहेर जातील आणि कधी नियमात बसतील यांबाबतची रेषा अगदी अस्पष्ट आहे. NPPAच्या नियमानुसार काही वेळेस फोटोचे रंग एनहान्स केलेले चालू शकतील; पण दोन फोटो एकत्रित करून वेगळाच फोटो बनवण्याला मात्र मान्यता दिली जाणार नाही. पहिल्यात नुसते रंग बदलले, ते ही खऱ्या नियमात बसत नाही, कारण जे नाही ते त्या फोटोत दाखवले गेले. पण क्वचित ठिकाणी ते चालून जाऊ शकेल. तर दुसरा नियमांचे पूर्ण उल्लंघन करणारा फोटो ठरेल.
अजून एक उदाहरण म्हणजे न्यूजविकच्या मुखपृष्ठावर (१९९७) मध्ये आलेल्या Bobbi McCaughey च्या फोटोत तिचे दात सरळ करून दाखवण्यात आले होते. त्यामुळे त्यावर बरीच टिका झाली होती. असे फोटोत केले जाणारे बदल हे मूळ फोटो बदलण्यापेक्षा त्यातल्या तांत्रिक गोष्टी नीट करण्यासाठी केले जावेत.

फोटो कॉन्टेक्स्ट (संदर्भ):
एखादा फोटो देताना त्याचा संदर्भ तपासून त्याबद्दल योग्य स्पष्टीकरण देणे अतिशय महत्वाचे आहे. गॉसिप मासिके आणि पेज-३ यांसाठी फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरवर नेहेमीच सत्याचा विपर्यास करण्याचा आरोप होत असतो. एखादा फोटोग्राफर दोन सिताऱ्यांना एकमेकाकडे बघून हसतानाचा फोटो काढू शकतो. पण प्रत्यक्षात मात्र ते सितारे कॅमेऱ्यात न दिसणाऱ्या दुसऱ्याच कोणाशीतरी बोलत, हसत असू शकतात. अशावेळी एका सितारयाने दुसऱ्याचे स्वागत केले किंवा तत्सम बातम्या या फसवणुकीच्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या असतात.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

खाजगीपणा जपणारे चित्रण:
भावनिक किंवा हिंसक प्रसंगात व्यक्तींचे खाजगीपण जपणे हा एक महत्त्वाचा पण तितकाच कठीण मुद्दा आहे. याबाबत फारसे काही नियम नसल्यामुळे मिडीया किंवा पत्रकार एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या घराबाहेर ठिय्या देऊन त्यांच्या खाजगीपणावर गदा आणतात. बहुतेक देशांत अशा गोष्टीकरता कठोर नियम आहेत आणि असे करणे कायद्याने गुन्हाही आहे. तसेच एखाद्या अपघातस्थळी अँब्युलन्स वगैरेसह धाव घेतानाचे फोटो हे बातमीचा एक भाग मानले जातात. मात्र अपघातग्रस्त व्यक्तींचे चित्रण बातमीमध्ये दाखवताना अतिशय काळजीपूर्वक दाखवले गेले पाहिजे. आजकाल याबाबत नियम कठोर केले गेले असून अशा व्यक्तींची किंवा तिच्या नातेवाईकांची परवानगी असल्याशिवाय असे फोटो प्रकाशित करता येत नाहीत.

नियमांचे उल्लंघन टाळणे:
अशा अनेक नियमांचे उल्लंघन टाळण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सत्य न दडवता फोटो देणे. जर रंग किंवा तत्सम गोष्टी बदलायच्या असतीलच तर त्याखाली "फोटो इल्स्ट्रेशन" किंवा "आर्टिस्टस इंटरप्रिटेशन" असे लिहीणे गरजेचे आहे.
अशा नियमांना समजून घेण्यासाठी एखादी कार्यशाळा किंवा क्लास घेणे हे ही आवश्यक आहे. जर तुम्हाला एखादा फोटो वापरण्याबद्दल शंका असेल, किंवा त्या फोटोचा पूर्ण संदर्भ माहित नसेल, तर तसे आपल्या मुख्य एडिटरला, एडिटरला किंवा आपल्या जेष्ठ सहकाऱ्यांना सांगणे जरुरीचे आहे.
सोसायटी ऑफ प्रोफेशनल जर्नालिस्टच्या ‘कोड ऑफ एथिक्स’मध्ये याबाबत एक अतिशय चांगला नियम आहे "Never distort the content of news photos or video. Image enhancement for technical clarity is always permissible. Label montages and photo illustrations."
फोटोजर्नालिझम आणि फोटोग्राफीची पाळेमुळे सुमारे दोन शतके मागे जातात. त्याकाळातही असे नियम होते आणि ते तांत्रिकतेपेक्षा कार्यक्षमतेवर आधारित होते. पण तंत्रात होणाऱ्या नवनवीन बदलांमुळे आणि उपलब्धतेमुळे अशा बदलांवर बंधने घालणे जरूरीचे झाले. आणि फोटोजर्नालिझममधली नीतीविषयक मूल्ये अस्तित्वात आली.


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

निष्कर्ष: या सगळ्याच मूल्यांची एकत्रितपणे यादी असलेला एखादा ग्रंथ किंवा पुस्तक नाही. या लेखात दिलेल्या अनेक फोटो आणि घटनांच्या संदर्भाने, आधाराने त्यावर बराच ऊहापोह झाला आहे. पण फोटोजर्नालिझमचा मुख्य उद्देश हा खरी आणि सत्य घटना चित्रित स्वरूपात लोकांसमोर आणणे हाच आहे. उगाच सनसनाटी बातमी निर्माण करून बातमीपत्राचा वाचकवर्ग वाढवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा बातमीपत्राचा वाचकवर्ग किंवा प्रसिद्धी कमी होणार असली तरीही सत्य तीच परिस्थिती लोकांसमोर आणली पाहिजे.
सध्याच्या काळात प्रोफेशनल फोटोजर्नालिस्टची मोबाईल कॅमेरे हाती असलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी स्पर्धा आहे. त्यामुळे फोटोजर्नालिस्टने फोटो काढणे आणि तो एडिटरेमार्फत मान्य होऊन मिडीयासमोर येणे यात केवळ काही मिनिटांचा अवधी मिळतो. मागच्याच वर्षी अमेरिकेतल्या एका एजन्सीने फोटोजर्नालिस्टना काढून त्याऐवजी इतर पत्रकारांनाच आयफोन दिला होता. पण तरीही परिश्रम आणि उत्कृष्ट क्वालिटी यांसाठी फोटोजर्नालिस्ट ही अजूनही तितकीच महत्त्वाची गरज आहे.

इतर आंतरजातीय संदर्भ:
http://www.oxforddictionaries.com/definition/english/ethics
https://nppa.org/document/8304
http://life.time.com/history/robert-capas-falling-soldier-the-modest-birth-of-an-iconic-picture/#ixzz3AGvspLjI
http://www.pdngallery.com/20years/timeline.html
http://www.complex.com/style/2013/07/the-biggest-photoshop-scandals/
http://www.npr.org/blogs/pictureshow/2013/01/28/169536213/what-it-feels-like-to-be-photographed-in-a-moment-of-grief?sc=tw&cc=share
http://www.wadelaube.com/blog/?p=838
http://petapixel.com/2010/04/21/reuters-retracts-icelandic-volcano-photo/
http://www.ap.org/Content/AP-In-The-News/2014/AP-severs-ties-with-photographer-who-altered-work
http://www.npr.org/blogs/pictureshow/2013/01/28/169536213/what-it-feels-like-to-be-photographed-in-a-moment-of-grief?sc=tw&cc=share
http://www.nanfangdaily.com.cn/southnews/shyp/200505120253.asp
http://www.spj.org/ethicscode.asp
http://www.nbcnews.com/id/13165165/ns/world_news-mideast_n_africa/t/altered-images-prompt-photographers-firing/
http://www.nbcnews.com/id/13165165/ns/world_news-mideast_n_africa/t/altered-images-prompt-photographers-firing/#.VDtjCymSzFc


फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि नीतिमत्ता ! इंद्रनील मुखर्जी

चित्रसंदर्भ:
http://www.washingtonpost.com/rf/image_2048w/2010-2019/WashingtonPost/2012/06/05/Interactivity/Images/AP_Eddie%20Adams.jpg
http://petapixel.com/assets/uploads/2012/09/napalm.jpg
http://www.montney.com/marine/iwo.htm
http://cloud.lomography.com/550/365/dc/cd1001295faeecd5813196e1ee375374538546.jp
http://www.bloomberg.com/slideshow/2012-04-26/photoshop-blunders-manipulated-reality.html#slide10
http://www.photographyschoolsonline.net/wp-content/uploads/2010/07/Photoshopped-Photo-No.2_National-Geographic.jpg
http://images.complex.com/complex/image/upload/t_article_image/knf36sxd5vvxdi6gyi4r.jpg
http://3.bp.blogspot.com/-oZrFwiX7PbI/TsvQluUoBBI/AAAAAAAAE3I/IuoxK9ORh60/s1600/KS+2.jpg
http://www.beevoz.com/wp-content/uploads/2014/04/hillary-clinton-foto-obama.jpg
http://www.adobephotoshoptraining.org/photoshop-training-images/mubarak-takes-the-lead.jpg
http://drypixel.com/wp-content/uploads/2009/02/picture-4.png
http://petapixel.com/assets/uploads/2010/04/reutersvolcano.jpg
http://www.ap.org/Content/AP-In-The-News/2014/AP-severs-ties-with-photographer-who-altered-work
http://littlegreenfootballs.com/article/21956_Reuters_Doctoring_Photos_from_Beirut
http://www.npr.org/blogs/pictureshow/2013/01/28/169536213/what-it-feels-like-to-be-photographed-in-a-moment-of-grief?sc=tw&cc=share
To Read in English मागील लेख पुढील लेख