1) Editorial 2) Life - A game of Light and... 3) Creative Nature Photogra... 4) Tasvir Banaata Huu.. 5) Wondering in a Jungle... 6) On the trail of birds... 7) American Dreamscape 8) Oh yeah! It’s Australia! 9) Street & People Photogra... 10) Ima Bazaar 11) Reflections 12) Observation@work 13) Wari! 14) Anandwari 15) Street Photography 16) Astrophotography 17) An exotic slideshow 18) Slideshow 19) Photography... 20) Splendid views of Mount... 21) Himachal – the land of... 22) Cinematographer 23) Photography... 24) Interview 25) Slideshow- Adhik... 27) Slidesow- Yuvraj Gurjar 28) Image Maker 29) Expressive Fractals 30) Guru 31) Vicious circle 32) Interview- Hari Mahidhar 33) A Letter to Mr. Adhik... 34) Slideshow- Hari Mahidhar 35) Interview- Vikram Bawa

प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे

दिलीप यंदे
अनुवाद - गार्गी गीध


प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे दिलीप यंदे, ठाणे

पाळीव प्राणी आणि पक्षी हे काही माणसांपेक्षा वेगळे नाहीत. प्रकाशचित्रणासाठी ते कधीही उत्तमच! फक्त या प्राण्यांना विशेष काळजी आणि प्रेमाची गरज असते. कारण ते केवळ ४ भिंतींच्या घरात नव्हे, तर आपल्या मनातही घर करून राहणार असतात. वन्यजीव प्रकाशचित्रण, मॉडेल व पोर्ट्रेट यांचं प्रकाशचित्रण हे तर आता तुमच्या परिचयाचं झालंच असेल. त्यामुळे विशेष चर्चिला न जाणारा विषय मी तुमच्यापुढे मांडणार आहे - तो म्हणजे 'पाळीव प्राण्यांचे प्रकाशचित्रण' (शूटींग पेट्स).

कोणत्याही प्रकारचं प्रकाशचित्रण करताना त्या-त्या विषयाचा अभ्यास असावा लागतो, यात शंकाच नाही. तसंच पाळीव प्राण्यांचं प्रकाशचित्रण करताना त्या-त्या प्राण्याच्या स्वभावाचा आणि त्याच्या प्रजातींचा अभ्यास करावा लागतो. ते प्राणी हाताळण्याची सहजता तुमच्यात उपजत असावी लागते.


प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे दिलीप यंदे, ठाणे

या क्षेत्रात उतरतानाचं माझं पहिलं शूट मला खूप काही शिकवून गेलं. तिथे मला एक उंचसा ग्रेट डेन हा कुत्रा आणि एक लहान मुलगी यांना एकत्र शूट करायचं होतं. त्या लहानगीनं या कुत्र्याला आधी कधीच हात लावलेला नसल्यानं माझ्यासाठी ही कसोटीच होती. तो काळ फिल्म फोटोग्राफीचा होता. १२० फॉरमॅटमधे सहा बाय सातच्या फिल्मवर मला केवळ दहा फोटो टिपता आले असते. त्यामुळे केवळ दहा प्रयत्नांत त्यांना चांगले फोटो देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ग्रेट डेन ही प्रजाती इतर प्रजातींच्या मानाने लहान मुलांमध्ये सहज मिसळते. तरी त्या लहानगीची कुत्र्याशी मैत्री करून देण्यात तासभर वेळ गेलाच. दोघांनाही एकत्र शूट करताना तिच्या चेहर्यावरचा आनंद दिसणं आवश्यक होतं. कुत्र्याची फार चलबिचल चालू होती. त्यामुळे माझे काही फोटो त्याच्या अस्थिरतेच वाया गेले. शेवटी तो दमून शांत झाला आणि जमिनीवर झोपला. मग ती मुलगीही खाली वाकली आणि मला २ चांगले फोटो मिळाले. पण कला दिग्दर्शकाचं मात्र समाधान झालं नाही. कारण त्यांना उभे फोटो अपेक्षित होते आणि मी आडव्या फ्रेम्स शूट केलेल्या. त्यामुळे पुन्हा शूट करणं भाग होतं. पण तो कुत्रा काही ढिम्म हलेना. तेवढ्यातल्या तेवढ्यात त्याच्या मालकानं 'ही समस्त जमात आळशी' असल्याचा शेरा मारून घेतला. नेमकं तेव्हाच घराला लागून असलेल्या गच्चीतून कावळ्याचा आवाज आला. इतका वेळ गळून पडलेलं हे ध्यान अगदी उत्साहानं उठलं. त्यामुळे आता या कुत्र्याला चावी कशी द्यायची याचा अंदाज आला. मी माझ्या सहकार्याला खिडकीमागे लपून कुत्र्याचं लक्ष वेधलं जाईल असे आवाज काढण्याची विनंती केली. आमचा हा खटाटोप पाहून छोट्या मुलीलाही मजा वाटू लागली...आणि अखेरीस एक चांगला फोटो मिळाला.


प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे दिलीप यंदे, ठाणे

कुत्र्यांबाबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर ते तुमच्या सहवासात अवघडत असतील, खेळीमेळीने राहत नसतील तर कधीही त्यांच्या डोळ्यांत थेट पाहू नये. त्यांना थोडी मोकळीक द्यावी. आपण त्यांच्याकडे निरखून पाहत नाही असं त्यांना जाणवल की ते सहजपणे वावरतात.

काही वर्षांपूर्वी टी.व्ही.वर एक जाहिरात प्रदर्शित होणार होती. या जाहिरातीत दोन समांतर ब्रँडची नावं एका मैदानातील दोन खांबांवर लिहिलेली. तेवढ्यात एक कुत्रा तिथे येतो, दोन्ही खांबांभोवती घुटमळतो आणि (साहजिकच) ज्यावर विरोधी ब्रँडचं नाव लिहिलेलं असतं त्या खांबापाशी मागचा पाय उंचावून विधी पार पडतो. ही जाहिरात पाहून मला प्रश्न पडला, की एवढ्या सराईतपणे हा कुत्रा योग्य त्या खांबापाशी कसा गेला? एके दिवशी मी त्या कुत्र्याच्या ट्रेनरला भेटलो आणि माझी शंका मांडली. ते हसून म्हणाले, की कुत्रे सहसा त्याच जागेवर पुन्हा मूत्रविसर्जन करत नाहीत. त्यामुळे त्यांनी थोडं मूत्र जमवून त्या खांबाभोवती शिंपडलं. जेव्हा लाईटस, कॅमेरासहित आम्ही सज्ज झालो तेव्हा कुत्रा वास घेत-घेत बरोबर आम्हाला हव्या असलेल्या खांबापाशी गेला आणि ही जाहिरात तयार झाली.


प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे दिलीप यंदे, ठाणे

'पाळीव प्राणी' हा किती संवेदनशील विषय आहे याची जाणीव पु.लं.च्या लेखनातून होते. पाळीव प्राणी आणि त्यांचं माणसाशी असलेलं नातं यावरची त्यांची निरीक्षणं खूप काही शिकवतात. कुत्र्याच्या प्रत्येक प्रजातीची स्वतःची अशी खासियत आहे. प्रत्येकाचं वागणं वेगळं, गुणधर्म वेगळे. जसं की, बुल डॉग, बॉक्सर हे दिसायला रावडी आहेत, तर जर्मन शेपर्ड, सायबेरीयन हस्की यांचे चेहरे लांडग्यासारखे असल्यामुळे काहीसे गंभीर वाटतात. तरी त्यांच्यात एक वेगळाच रुबाब जाणवतो. ल्हासा, पुडल्स या प्रजाती काहीशा नाजूक वाटतात. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन फोटो काढताना आपल्याला साजेशा प्रजातीचा वापर करावा. या फोटोत दिसणारे पर्शियन मांजरी आणि बर्नाड जातीची कुत्र्याची पिल्लं यांचे फोटो काढताना वापरलेले प्रॉप्स बघूनही बरंच काही शिकता येईल.

कोणत्याही पाळीव प्राण्याचे फोटो काढताना तुमची त्याच्याशी ओळख होणं आवश्यक असतं. लाईटस्, स्टँड आणि कॅमेरानं भरलेल्या वातावरणात तो मिसळेल याची काळजी घ्यावी लागते. तसंच जर एखादा पाळीव प्राणी आणि त्याला अपरिचित मॉडेल यांचे फोटो काढायची वेळ आली तर त्या दोघांचीही चांगली मैत्री होईल याची दक्षता घ्यावी लागते. तरच पाळीव प्राण्यांचं प्रकाशचित्रण फोटोग्राफर, तो प्राणी आणि बघणारा या सगळ्यांनाच आनंद देऊ शकेल.


प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे दिलीप यंदे, ठाणे


प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे दिलीप यंदे, ठाणे


प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे दिलीप यंदे, ठाणे
To Read in English PREVIOUS NEXT