1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

बोलक्या रेषा

ज्योती राणे
गेली


बोलक्या रेषा ज्योती राणे, ठाणे

मला जेव्हा समजलं, की मला डिजीटल आर्टबद्दल लेख लिहायचाय, तेव्हा मला प्रश्न पडला की फोटोग्राफीच्या अंकात आर्टबद्दल कसं लिहायचं? पण पुन्हा विचार मनात आला, की फोटोग्राफी ही सुद्धा एक कला आहे आणि फोटोग्राफरही एक कलाकार असतो. म्हणूनच तर तो इतकी सुंदर काम्पोझिशन्स, लाईट इफेक्टस, रंग इत्यादींचा विचार करू शकतो.

तर डिजीटल आर्ट ही सुद्धा एक अशी कला आहे जी खूप जास्त लाईट इफेक्टस आणि रंग यांवर अवलंबून आहे. या आगळ्यावेगळ्या आर्टची आणि माझी गाठभेट अगदी अचानकच झाली. एकदा अचानक इंटरनेटवर एका जर्मन आर्टीस्टचं डिजीटल आर्टवर्क मी बघितलं. ते काम बघून मी अक्षरशः अचंबित झाले. त्या कलाकारीमुळे मी इतकी प्रभावित झाले, की हे नक्की काय आहे हे शोधून काढल्याशिवाय मला चैन पडेना. मग त्या जर्मन कलाकाराबद्दल आणि तिच्या कामाबद्दल माहिती काढायला सुरूवात केली. नक्की कोण कोणते सॉफ्टवेअर्स वापरतात, कसे वापरतात, एका वेळी किती प्रकारचे सॉफ्टवेअर्स वापरतात, एडिटिंग कसं करतात अशी सगळी माहिती शोधून काढली. ते सॉफ्टवेअर्स डाऊनलोड केले आणि प्रयोग करायला सु्रूवात केली. हळूहळू समजायला लागलं आणि रिझल्ट्सही दिसायला लागले. मला खूप आनंद झाला. एखादी इमेज तयार झाल्यानंतर मी माझ्या मित्रमंडळींमध्ये दाखवून त्यांच्या प्रतिक्रिया विचारायचे. त्यावरून मला समजायला लागलं, की हे काहीतरी इंटरेस्टिंग होतंय आणि सगळ्यांना आवडतंय. मला तर ते आवडलं होतंच. मग मी अधिकाधिक मन लावून त्यात काम करायला सुरूवात केली. मला खूप मजा वाटायला लागली.


बोलक्या रेषा ज्योती राणे, ठाणे

एकदा सहजच मी एका ऑनलाईन खुल्या प्रदर्शनासाठी (डिजीटल आर्ट : कॅलिफोर्निया) माझे काही आर्टवर्क्स पाठवले. तिथे जगभरातल्या कुशल डिजीटल कलाकारांनीही भाग घेतला होता. तेव्हा अजिबात अपेक्षा नसताना तिथे मला 'स्टेलर आर्ट अवॉर्ड' मिळालं, या अवॉर्डचं स्वरूप म्हणजे आपलं काम त्यांच्या वेबसाईटवर ते कायम एक्झीबिट करणार, त्यांच्या प्रसिद्धीपत्रकांमध्ये ते काम छापून येणार. हे अवॉर्ड मिळाल्यानंतर माझा आत्मविश्वास आणखी वाढला आणि वाटलं चला, आपण जे काम करतोय त्याची कुठेतरी दाखल घेतली जातेय. मग काम करण्याचा अजून हुरूप आला.

‘डिजीटल आर्ट: कॅलिफोर्निया च्या वेबसाईटवर जाण्यासाठी ही लिंक आहे.


बोलक्या रेषा ज्योती राणे, ठाणे

खरं म्हणजे या कलेला फ्रॅक्टल आर्ट असंही म्हटलं जातं. फ्रॅक्टल आर्ट किंवा डिजीटल आर्ट ही एक आर्टीस्टीक प्रोग्रेस किंवा प्रवास आहे. डिजीटल टेक्नोलॉजीचा वापर हा या क्रिएटिव्ह प्रोसेसचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मात्र इतर कुठल्याही कलेप्रमाणेच डिजीटल टेक्नोलॉजी हे इथे फक्त एक माध्यम आहे, बाकी तुमचं कौशल्य, कला आणि सृजनशीलता यांच्या साहाय्यानं तुम्ही अनेक चित्रं साकारू शकता. जितकं तुम्ही त्यात गुंतत जाल, तितकं ते अधिक कठीण आणि गोंधळात टाकणारंही वाटायला लागतं. पण हळूहळू त्यात दिसणारी वेगवेगळी एक्स्प्रेशन्स बघितली, की अधिकाधिक काम करण्याचा उत्साह वाढत जातो. या कलेचा वापर बहुतेकवेळा जाहिरातक्षेत्रात आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये केला जातो.

खरं म्हणजे मी स्वतःला फार भाग्यवान समजते, की मी आजच्या म्हणजे कॉम्प्युटर/ डिजीटल टेक्नोलॉजीच्या युगात जन्माला आलेय. आज प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटरची गरज पडते. कलाक्षेत्रसुद्धा यात मागे राहिलेलं नाही. साधारणपणे १९९०नंतर जी प्रगती झाली त्याचा परिणाम कलाक्षेत्रावर सुद्धा झालाय. आपण या कलेला समकालीन अमूर्त चित्रशैली असंही म्हणू शकतो. यात मुख्य म्हणजे ज्या सॉफ्टवेअर फाइल्स वापरल्या जातात त्या अगोदरच प्रोग्राम करून ठेवलेल्या असतात. त्यांचे दोन प्रकार आहेत, त्यांना फ्रॅक्टल आणि फ्लेम्स म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या फाईल्स म्हणजे फ्रॅक्टल आर्टमधील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहेत. फ्रॅक्टल हे वास्तविक गणिती सूत्र वापरून बनवलेले असतात. त्यामुळेच याला गणिती कला म्हणूनही ओळखलं जातं.


बोलक्या रेषा ज्योती राणे, ठाणे

फ्लेम्स म्हणजे अल्गोरीथमिकल कॅलक्युलेशन्सनं बनविलेल्या फाईल्स असतात. हे प्रोग्राम्स डिझाईन करण्यासाठी काही सॉफ्टवेअर्स वापरली जातात. या फ्लेम्स फाईल आपल्याला एखाद्या जादुई छडीसारख्या वाटतात. कारण एखादं चित्र साकारताना ते शेवटी कसं दिसणार आहे हे आपल्याला माहित नसतं. मला स्वतःला यातला ऑटोमॅटीझम खूप आवडतो. काय ईमेज तयार होणार आहे हे आधी काहीच कळत नाही, त्यामुळे एक कुतूहल निर्माण होतं. ही आगळीवेगळी गोष्टच आपल्या सृजनशीलतेला जणू काही आव्हान देत राहते.

फ्रॅक्टल आणि फ्लेम्सचा जर नीट अभ्यास केला तर कळतं, की त्यात वेगवेगळे आकार साकार करण्याची भरपूर क्षमता आहे. यात लाईट ईफेकट्स, आकार आणि रंग यात खूप विविधता उपलब्ध आहे. कॉम्प्युटर वापरून फ्रॅक्टल आर्ट करताना काही जादुई आदेश (कमाण्डस) विषममित अमूर्त आकारांची सममित चित्रं घडवून आणतात. सगळ्यांत महत्त्वाचा भाग म्हणजे हा भाग हाताळण्याचा कंट्रोल आपल्या हातात नसतो, त्यामुळेच फ्रॅक्टल आर्ट हे खूप आव्हानात्मक वाटतं.


बोलक्या रेषा ज्योती राणे, ठाणे

पण आव्हानात्मक असलं तरीही ते सृजनशीलता जागृत करतं, तेवत ठेवतं, आपल्याला ताजंतवानं करतं.

फ्रॅक्टल पॅटर्न्स तसे आपल्याला आपल्या आजूबाजूला निसर्गात सुद्धा सहजपणे बघायला मिळतात. जसं झाडांच्या फांद्या, नद्या, समुद्रकिनारे, पर्वत, ढग इत्यादी. एखादा कलाकार जेव्हा आपल्याला हवं ते चित्रं काढून रंगवतो, तेव्हा त्याच्या मनात एक प्रतिमा किंवा संकल्पना तयार असते. पण याउलट फ्रॅक्टल आर्ट करताना आपण काय चित्र बनवणार आहोत हे कलाकाराला माहिती नसतं. आपण जणू काही आपोआपच चित्र काढतोय असं वाटतं. हाच यातला सर्वात सुंदर भाग आहे असं मला वाटतं.


बोलक्या रेषा ज्योती राणे, ठाणे

मी माझ्यातल्या कल्पकतेला चालना देण्यासाठी ऑटोमॅटीझमचा वापर करून माझ्या मनातले विचार मांडायचा प्रयत्न करते. थोडक्यात सांगायचं म्हणजे समजा तुम्हाला अचानक एखादा विषय दिला आणि सांगितलं की तुम्ही या विषयावर ५ मिनिटं विचार करून बोला, तर तुम्ही विचारांची जुळवाजुळव करून अगदी थोड्या वेळाचं भाषण जास्तीत जास्त कसं खुलवून सांगण्याचा प्रयत्न कराल, अगदी तसंच आहे हे. माझ्यासमोर एखादी फ्लेम (फाइल) असते तेव्हा तिचं स्वतःचं एक अस्तित्व असतं. पण मला तिला अजून सुंदर करायचं आहे म्हणून मी तिची मूल्यं, लाईट ईफेकट्स, रंग बदलवून त्यातून मला भावणारं चित्र तयार करते. शेवटी माझ्या मनातल्या भावना दर्शवणारी एक अर्थपूर्ण कलाकृती तयार होते, माझे विचार व्यक्त होतात आणि मग तयार झालेलं चित्रं बघताना आपण आतमधून हलकेच सुखवतो.


बोलक्या रेषा ज्योती राणे, ठाणे

भारतात या कलेचा अजून फारसा विस्तार झालेला नाहीये. मात्र मुख्यतः युरोप आणि अमेरिकेत या कलेला तितकंच महत्व आहे जितकं एखाद्या कलाकारानं हातानं काढलेल्या पेंटींगला असतं. आजकाल ऑनलाईन एक्झीबिशन गॅलरीज असल्यामुळे फ्रॅक्टल आर्टचा प्रसार खूप जोरात आणि जोमात आहे. या विषयाच्याही विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यामुळे कलाकारालाही प्रोत्साहन मिळतं.

ज्याप्रमाणे फोटोग्राफसाठी आपण प्रताधिकार नोंदवतो त्याचप्रमाणे फ्रॅक्टल आर्टच्या प्रताधिकाराची नोंद करण्याची आवश्यकता भासते. कारण खूप सहजपणे कोणीही त्याच्या प्रती बनवून त्याचा वापर करू शकतं. म्हणूनच खूप काळजी घ्यावी लागते.

मनात प्रतिमा तयार नसतानाही एखाद्या आकाराचे लाईट ईफेकट्स, रंग बदलवून आपल्याला हवी तशी कलाकृती निर्माण करता येणारं हे फ्रॅक्टल आर्ट माध्यम मला सहज व्यक्त व्हायला मदत करतं आणि त्यामुळेच खूप आवडतं.


बोलक्या रेषा ज्योती राणे, ठाणे


बोलक्या रेषा ज्योती राणे, ठाणे
To Read in English मागील लेख पुढील लेख