1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

तसवीर बनाता हूँ…

सुभाष जिरंगे
इंडियन


तसवीर बनाता हूँ… सुभाष जिरंगे

पोर्ट्रेट फोटोग्राफी हा प्रत्येक प्रकाशचित्रकाराचा आणि सामान्य लोकांचासुद्धा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. कॅमेरा काय किंवा मोबाईल काय, नवीन खरेदीनंतर प्रत्येकाचा कल असतो तो घरातल्या मंडळींचा फोटो क्लिक करण्याकडे! मनामध्ये झुलणारा आठवणींचा हिंदोळा भविष्यातही फोटोंच्या स्वरूपात झुलत राहावा ही एक आंतरिक इच्छा त्यामागे असते. आयुष्यातल्या लहान-मोठ्या सुखाच्या क्षणांचे साक्षीदार म्हणूनच आपले फोटो आपल्याजवळ, अगदी हृदयात असावेत असं प्रत्येकाला वाटत असतं…

तसं पाहायला गेलं तर, पोर्ट्रेट फोटोग्राफीतलं सखोल ज्ञान प्रत्येकाला असतंच असं नाही. परंतु एखादा फोटो काढण्यामागचा त्याचा उद्देश मात्र स्पष्ट असतो. तरीसुद्धा हव्या असलेल्या प्रतीचा फोटो त्याच्याकडून काढला जात नाही किंबहुना त्याला ते जमत नाही. इतकंच काय, प्रकाशचित्रणाच्या इतर विषयांत प्राविण्य मिळविलेल्या प्रकाशचित्रकारांना सुद्धा उच्च दर्जाचं व्यक्तिचित्रण करणं काही वेळा शक्य होत नाही. या विषयीचं तांत्रिक ज्ञान त्यांना असतं. परंतु ते स्वत: प्रयत्न करून या प्रकारच्या फोटोग्राफीमध्ये थेट उतरताना दिसत नाहीत. जेव्हा वारंवार प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही ते साध्य होत नाही तेव्हा मात्र मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतातील हे शब्द मनाला डंख मारायला लागतात…

‘तसवीर बनाता हूँ, तसवीर नहीं बनती… तसवीर नहीं बनती ।
एक ख्वाब सा देखा हैं, ताबीर नहीं बनती… तसवीर नहीं बनती।


तसवीर बनाता हूँ… सुभाष जिरंगे

मी इयत्ता आठवीच्या वर्गात होतो. आमच्या चित्रकलेच्या सरांनी तास चालू असताना एक छोटीशी सत्य घटित कथा ऐकविली. 'मनुष्य प्राण्याचे निवेदित अंग म्हणजेच भावना, त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे शरीर साधर्म्य, त्याचा रागरंग (मूड) हे तंतोतंत प्रगट करण्यासाठी, जीवाचा आटापिटा करणारा एक सुप्रसिध्द चित्रकार एका व्यक्तीच्या शोधात होता. अशी व्यक्ती जिच्या चेहेऱ्यावर निरागस भाव असावेत. हे निरागस भावच त्याला टिपायचे होते. खूप शोध घेतला. सारा प्रदेश पिंजून काढला. एके दिवशी तो सकाळी गावातून बाहेर पडत असताना गावाच्या वेशीवरून गुरांच्या मागून जाणारी काही लहान मुलं त्याच्या दृष्टीस पडली. त्यातच शेवटी त्याला निरागस चेहऱ्याचं एक गुराखी बाळ भेटलं. त्याने त्याचं पोर्ट्रेट चितारलं आणि ते खूप प्रसिध्द झालं.

काही काळानंतर तोच चित्रकार, मानवाच्या अतिउग्र, महाभयानक चेहऱ्याच्या शोधात होता. तो हेतू समोर ठेवून त्याने तुरुंगातील कैद्याचं चित्र रेखाटायचं ठरवलं. त्यासाठी तुरुंगातील एका कैद्याची निवड केल्यानंतर त्याचं पोर्ट्रेट चितारलं गेलं अन तेही खूप प्रसिध्द झालं. ते चित्र रेखाटताना त्याच्या लक्षात आलं, की वीस वर्षापूर्वी ज्या निरागस बाळाचं चित्र रेखाटलं होतं ते बाळ म्हणजेच आजचा अतिउग्र कैदी होता!!! एकाच व्यक्तीच्या अतिभिन्न व्यक्तिरेखा!

त्या कथेतला गर्भितार्थ माझ्या मनात अजूनही घट्ट घर करुन बसला आहे. आणि म्हणूनच कोणतंही पोर्टेट काढताना अप्रत्यक्षपणे समोर उभी असते ती… व्यक्तिरेखा!!!


तसवीर बनाता हूँ… सुभाष जिरंगे

तसवीर (पोर्ट्रेट) म्हणजे तरी काय? तर एखाद्या व्यक्तीचे कलात्मक रेखाटन. हे रेखाटन म्हणजे सामान्यतः अगदी सहजतेने काढलेली तसवीर नव्हे तर एखाद्या व्यक्तीचे स्थिर जागी काढलेले रचनात्मक चित्र होय, ज्यामध्ये चेहरा आणि भावाविष्कार प्रधान असतो. मग तो फोटोग्राफ असो, पेंटिंग असो, शिल्प असो किंवा इतर कलात्मक अभिव्यक्ती असो.

बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यानांच आपापल्या प्रतिमेची आवड असते. तो निसर्ग नियम आहे. आपल्या समोरील आरशात प्रतिबिंबित झालेली आपली छबी वर्षानुवर्षे पाहूनसुद्धा जशी स्वतःला ज्या तीव्रतेने आवडते तशीच ती इतरांनाही आवडली पाहिजे. यासाठी कोणत्याही व्यक्तीचे कॅमेऱ्याने चित्र रेखाटताना त्यासाठी आवश्यक तथा साहाय्यभूत असणाऱ्या साधनांचा नीटस अभ्यास करायला हवा. त्यांच्या वापरासंबंधीची गणितीय पद्धत योग्य रीतीने अंगिकारायला हवी. सहयोगी वातावरणाचं सखोल ज्ञान अवगत करायला हवं.

प्रकाशचित्रणातील अंगभूत असा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रकाशयोजना !!! केवळ प्रकाशाच्या विविध योजना आणि मांडणीनुसार माणसाच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलू चितारणं शक्य होतं. माणसाच्या लपलेल्या व्यक्तिमत्वाला प्रकाशात आणायचं काम फोटोग्राफरचं आहे. ती व्यक्ती ज्या पातळीवरचं आयुष्य जगत आहे, त्यातला खरेपणा तंतोतंत रेखाटला जाण्यासाठी त्या व्यक्तीची राहण्याची, वागण्याची, काम करण्याची, भाव प्रदर्शित करण्याची पद्धत यांचं बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं ठरतं. मग तो विविध वेशभूषा करवेल, ज्या वातावरणात ती व्यक्ती वावरत आहे, जगत आहे, ज्या क्षेत्रात ती कारागिरी करत आहे, त्या वातावरणाशी सुसंगत असा पेहराव असेल याची दक्षता घेईल.


तसवीर बनाता हूँ… सुभाष जिरंगे

सर्वसामान्यपणे पोर्ट्रेट फोटोग्राफीची आराखडित दृश्य, पूर्ण चेहऱ्याचं दृश्य आणि three quarter दृश्य अशी तीन अभिधानं आहेत. इनडोअर पोर्ट्रेटमध्ये त्या व्यक्तीचं आंतरमर्म सादर होणं आवश्यक आहे. तसेच Environmental पोर्ट्रेट करताना त्या व्यक्तीच्या भावप्रदर्शनाबरोबरच त्याचं कौशल्य, त्या क्षेत्रातील त्याचं प्राविण्य, त्याच्या सभोवतालचं जीवन आणि वातावरण हेही प्रकर्षानं प्रतिबिंबित व्हायला हवं.

तांत्रिक ज्ञानाला कल्पकतेची जोड असेल तर सर्जनशीलतेचं उत्तम पर्यावसान हाती लागल्याचं समाधान नेहमीच मिळत असतं.

साधारणतः चित्रकला आणि प्रकाशचित्रण ह्या दोन्ही माध्यमांतून द्विमितीय कलाकाम प्रदर्शित होत असतं. त्याउलट शिल्पकला ही त्रिमितीय कलाप्रकारात मोडते. यामध्ये दर्शक स्वतः आपले स्थान बदलून विविधांगांनी ते शिल्प पाहण्याचा आनंद घेऊ शकतो. परंतु वर उल्लेखलेल्या दोन प्रकारांमध्ये ते शक्य होत नाही. असं जरी असलं, तरी एक सृजनशील प्रकाशचित्रकार एखादी तसवीर काढताना प्रकाशयोजनेचा कलात्मक दृष्टीने वापर करून द्विमितीय प्रकाशचित्रांना त्रिमितीय परिणाम देऊ शकतो. असा परिणाम साध्य झालेली प्रकाशचित्रं केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर इतर दर्शकांनाही भावतात. त्यांच्या मनाचा ठाव घेताना दिसतात. असं चित्र जिवंत असल्याचा दर्शकांना तथा कलाप्रेमींना आनंद मिळतो. हे त्या प्रकाशचित्रकाराचं कौशल्य असतं.


तसवीर बनाता हूँ… सुभाष जिरंगे

जगविख्यात सौंदर्यशास्त्रज्ञ Aristotle यानं म्हटल्याप्रमाणे "The aim of Art is to present not the outward appearance of things, but their inner significance; for this, not the external manner and detail, constitutes true reality. Artists may strive for photographic realism or an impressionistic similarity in depicting their subject, but this differs from a caricature which attempts to reveal character through exaggeration of physical features."

[कोणत्याही कलेचं उद्दिष्ट हे वस्तूचं नुसतं बाह्यसौंदर्य दाखवण्यासाठी नसून त्याचा आंतरिक अर्थ उलगडून सांगणं हे असायला हवं. बाह्यरूपात दिसणाऱ्या गोष्टी सत्य पुढे आणतीलच असं नाही. चित्रकारानं वास्तवदर्शी अथवा इतर कोणतीही शैली वापरली तरीही त्या विषयाचं यथार्थ चित्रण करायला हवं. मात्र हे चित्रण व्यंगचित्रणाप्रमाणे अतिशयोक्तीपूर्णही असता कामा नये.]

आणि Edward Burne-Jones चं हे विधान… "The only expression allowable in great portraiture is the expression of character and moral quality, not anything temporary, fleeting, or accidental."

[उत्कृष्ट व्यक्तीचित्रणामध्ये तात्पुरत्या, बाह्यरूपातल्या गोष्टीपेक्षाही त्या व्यक्तीचा स्वभाव आणि गुणदोष दर्शवले गेले पाहिजेत.]


तसवीर बनाता हूँ… सुभाष जिरंगे

जगविख्यात सौंदर्यशास्त्रज्ञ Aristotle यानं म्हटल्याप्रमाणे "The aim of Art is to present not the outward appearance of things, but their inner significance; for this, not the external manner and detail, constitutes true reality. Artists may strive for photographic realism or an impressionistic similarity in depicting their subject, but this differs from a caricature which attempts to reveal character through exaggeration of physical features."

[कोणत्याही कलेचं उद्दिष्ट हे वस्तूचं नुसतं बाह्यसौंदर्य दाखवण्यासाठी नसून त्याचा आंतरिक अर्थ उलगडून सांगणं हे असायला हवं. बाह्यरूपात दिसणाऱ्या गोष्टी सत्य पुढे आणतीलच असं नाही. चित्रकारानं वास्तवदर्शी अथवा इतर कोणतीही शैली वापरली तरीही त्या विषयाचं यथार्थ चित्रण करायला हवं. मात्र हे चित्रण व्यंगचित्रणाप्रमाणे अतिशयोक्तीपूर्णही असता कामा नये.]

आणि Edward Burne-Jones चं हे विधान… "The only expression allowable in great portraiture is the expression of character and moral quality, not anything temporary, fleeting, or accidental."

[उत्कृष्ट व्यक्तीचित्रणामध्ये तात्पुरत्या, बाह्यरूपातल्या गोष्टीपेक्षाही त्या व्यक्तीचा स्वभाव आणि गुणदोष दर्शवले गेले पाहिजेत.]


तसवीर बनाता हूँ… सुभाष जिरंगे

वर उदधृत केलेल्या विचारांचा जर काळजीपूर्वक अभ्यास केला तर पोर्ट्रेट फोटोग्राफीचा उद्देश आणि सार काय हे लक्षात येतं. यशस्वी प्रकाशचित्रकार म्हणून जर हे प्रत्येकाला अवगत झालं आणि आपल्याच आवडत्या व्यक्तीची एक उत्कृष्ट तसवीर काढली गेली तर, मजरूह सुलतानपुरी यांचंच अजून एक गीत प्रत्येकाच्या ओठांवर आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की !!!

तसवीर तेरी दिल में, जिस दिन से उतारी हैं
फिरू तुझे संग ले के, नये नये रंग ले के, सपनोंकी महफ़िल में।

http://subhashjirange.blogspot.com
http://subhashs1711.blogspot.com/


तसवीर बनाता हूँ… सुभाष जिरंगे


तसवीर बनाता हूँ… सुभाष जिरंगे


तसवीर बनाता हूँ… सुभाष जिरंगे


To Read in English मागील लेख पुढील लेख