1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

पक्ष्यांच्या मागावर…

अतुल धामणकर


पक्ष्यांच्या मागावर… अतुल धामणकर

अनेक वर्षांपूर्वी वन्यजीव अभ्यासाबरोबरच मी वन्यजीव प्रकाशचित्रणालाही सुरुवात केली होती. पक्षी-प्रकाशचित्रण हा माझा आणखी एक आवडता विषय. विविधरंगी, सतत किलबिल करत इकडूनतिकडे बागडणारे पक्षी पाहिले की त्यांची ती मोहक अदा कॅमेऱ्यात बंदिस्त करायचा मोह होतोच. त्यामुळे मी ही पाखरांच्या मागे लागून त्यांचं प्रकाशचित्रण करू लागलो.

पक्षी प्रकाशचित्रणाला सुरुवात केली तेव्हा काही काळातच माझ्या लक्षात आलं की आपल्याला वाटतं तेवढं हे प्रकरण सोपं नाही. पक्षी लहान असो की मोठा, तो माणसाला सहजासहजी जवळ येऊ देत नाही. मी सुरुवातीला फक्त ३००मिमीची लेन्स घेऊन प्रकाशचित्रणाचा प्रयत्न केला आणि अनेकवेळा अपयशी ठरलो.

मग मात्र मी बारकाईने आधी पक्ष्यांच्या प्रत्येक हालचालीचं निरीक्षण करू लागलो. त्यांची वागणुक, त्यांचा अधिवास, वैशिष्ट्यं यांचा अभ्यास सुरु केला. त्यामुळे मला त्यांच्या जवळ कसं जाता येईल याचा अंदाज यायला लागला. कोणताही पक्षी माणसाच्या आकृतीला पाहूनच दूर उडून जातो. आसपासच्या परिसरात मिसळून जातील असे हिरवे, कॅमोफ्लॉज कपडे घातले, तरच त्यांच्या जवळ जाता येतं. डोक्याचा आकार वेगळा दिसावा म्हणून टोपी किंवा हॅटशिवाय जाणं बरोबर नाही हे ही लक्षात आलं.


पक्ष्यांच्या मागावर… अतुल धामणकर

इतका सरंजाम केल्यावर काही पक्षी सहज जवळ येऊ देतात; तर काहींच्या जवळ जाता येण्यासाठी बरीच वाट बघावी लागते. शिवाय जंगल, माळरान, नदी, पाणवठे अशा एखाद्या जागी निश्चलपणे तासन्तास बसून पाखरांची वाट बघणं आलंच. अशावेळी मी स्वत:ला आसपासच्या परिसरात मिसळून जाऊन लपण्यासाठी एक कॅमोफ्लॉज कापडाची पोर्टेबल लपण (ground hide / blind ) वापरतो.

अशा लपणामुळे बऱ्याचवेळी पक्षांना त्याजागी माणूस असल्याचा सुगावा लागत नाही. त्यामुळे साहजिकच ते निर्धास्तपणे जवळ येतात शिवाय आपल्या हालचालीही मुक्तपणे करतात. माझ्यासारख्या अभ्यासक प्रकाशचित्रकारासाठी हे फारच मोलाचं असतं. त्यामुळेच मला त्यांच्या चांगल्या पोझबरोबरच अनेक बाबींचा आणि हालचालींचा छान अभ्यास करता येतो.

मात्र लपणात बसून फोटोग्राफी करणं सोपं वाटत असलं तरी कठीणच बाब आहे. तासन्तास एकाच जागी मांडी घालून कॅमेऱ्याला डोळा लावून बसल्यावर घामाघूम व्हायला होतं. पाठ आणि कंबरेला राग लागते आणि अगदी अवघडून जायला होतं. नेमक्या अशाच वेळी समोर एखादा पक्षी येतो आणि त्याच्या मुक्त हालचाली टिपण्याचं भाग्य आपल्याला लाभतं. लपणात असं अवघडून बसून मला अनेकवेळा पाखरांचे अप्रतिम फोटो मिळाले आहेत. त्या 'आय लेवल शॉट’मध्ये एक वेगळीच खुमारी असते.


पक्ष्यांच्या मागावर… अतुल धामणकर

मी पक्ष्यांच्या प्रकाशचित्रणासाठी आजवर अनेक दिव्यं केली आहेत. एकाच जागी झोपून वाट बघणे, एखाद्या फांदीवर तासन्तास अवघडून बसून राहणे, ओलसर जमिनीवर बसून प्रचंड संख्येने तुटून पडणाऱ्या डासांना तोंड देणे अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. पण त्यामुळेच माझ्या पक्षी प्रकाशचित्रणामधे विविधता पहायला मिळते.

पक्ष्यांच्या प्रकाशचित्रणासाठी मी आजवर हिमालयापासून दक्षिण भारतापर्यंत आणि गुजरातपासून ईशान्येच्या घनदाट जंगलांपर्यंत सगळीकडे भटकलो आहे. या भटकण्याची आणि निरीक्षण करण्याची मौज काही वेगळीच आहे. त्यातली खुमारी भटकण्याचा अनुभव घेतल्याशिवाय मुळीच कळणार नाही. त्यामुळेच मी सगळ्यांना सांगेन की खरा निसर्ग अनुभवायचा असेल तर पक्ष्यांच्या प्रकाशचित्रणाला सुरुवात करा.

atultiger@rediffmail.com


पक्ष्यांच्या मागावर… अतुल धामणकर


पक्ष्यांच्या मागावर… अतुल धामणकर


पक्ष्यांच्या मागावर… अतुल धामणकर


पक्ष्यांच्या मागावर… अतुल धामणकर


पक्ष्यांच्या मागावर… अतुल धामणकर


पक्ष्यांच्या मागावर… अतुल धामणकर


पक्ष्यांच्या मागावर… अतुल धामणकरTo Read in English मागील लेख पुढील लेख