1) प्रस्तावना 2) प्रकाश आणि सावलीचा खेळ म्हणजे... 3) कलात्मक निसर्ग प्रकाशचित्रण 4) तसवीर बनाता हूँ… 5) जंगल न्याहाळताना... 6) पक्ष्यांच्या मागावर… 7) अमेरिकन ड्रीमस्केप 8) ऑस्ट्रेलिया.... या सम हा...! 9) रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी... 10) इमा बाजार 11) बिंब – प्रतिबिंब 12) ऑबसेर्व्हशन@वर्क 13) वारी ! 14) आनंदवारी 15) स्ट्रीट फोटोग्राफी 16) खगोलीय प्रकाशचित्रण 17) एक अनोखा स्लाईड शो 18) स्लाईड शो 19) फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम आणि... 20) स्प्लेण्डीड व्ह्यूज ऑफ माउंट फुजी 21) देवभूमी हिमाचल - लाहौल स्पिती 22) सिनेमॅटोग्राफर- संदीप यादव 23) प्रकाशचित्रण, पाळीव प्राण्यांचे 24) मुलाखत- अधिक शिरोडकर 25) प्रकाशचित्रणाचा छंद 27) स्लाईड शो- युवराज गुर्जर 28) 'इमेज मेकर'- बिभास आमोणकर 29) बोलक्या रेषा - ज्योती राणे 30) गुरू - मिलिंद देशमुख 31) विषम चक्र- अंकिता वनगे 32) मुलाखत- हरी महीधर 33) आदरणीय सर - प्रवीण देशपांडे 34) स्लाईड शो- हरी महीधर 35) मुलाखत- विक्रम बावा

‘रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे’

जॉयदीप मुखर्जी, कोलकता
जॉयदीप मुखर्जी कोलकत्याच्या एका एमएनसी मध्ये काम करतानाच फोटोग्राफीचा छंदही जोपासतात. त्यांच्या मते एखाद्या कलाकाराच्या कलेला मान्यता मिळण्यासाठी त्यात सातत्य असणे जरुरीचे आहे. फोटोग्राफरचे डोळे हे शटरसारखे आणि मन हे एखाद्या लेन्स सारखं असलं पाहिजे. जॉयदीप मुखर्जी यांना विविध खेळ, प्रवास, ट्रेकिंग यांची आधीपासूनच आवड होती. २००३साली अन्नपूर्णा बेस कॅम्प येथे केलेल्या ट्रेक पासून त्यांना फोटोग्राफीचा छंद जडला तो आजतागायत. त्यांच्या मते फोटोग्राफरकडे एखाद्या साध्या घटनेला अगदी महत्वपुर्ण घटना बनवून फोटोत प्रेझेंट करता येणे गरजेचे आहे. फोटोग्राफ हे नुसते सौंदर्य दाखवण्यासाठी नसून त्या घटनेबद्दलची गोष्टं सांगणारे असावेत असही ते मानतात.

अनुवाद - मेघना शाह


रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे जॉयदीप मुखर्जी, कोलकता

‘रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे’ यांचे प्रकाशचित्रण करणे मला फार आवडते. मी प्रकाशचित्रणाची सुरुवातच या विषयाने केली, कारण नुसत्या शाबासकीपेक्षा काहीतरी भरीव, स्वत:ला व्यक्त करता येईल असे काम करायला हवे असे मला वाटते. प्रकाशचित्रकाराने तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेच पाहिजे, जेणेकरून तो एखाद्याच्या आयुष्यातील साधे प्रकाशचित्र देखील उत्तम प्रकाशचित्रात परिवर्तित करू शकेल. माझ्या मते प्रत्येक प्रकाशचित्रातून फक्त सौंदर्याचा पैलू दिसता कामा नये, तर त्यातून एखादी घटना देखील उलगडली पाहिजे.

रस्त्यावरील प्रकाशचित्रण करताना सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिथे क्षणाक्षणाला काहीतरी घडत असते. त्यामुळे तुम्हाला प्रकाशचित्रण करण्यास भरपूर संधी असते. अगदी लहान जागेत देखील तुम्ही असे क्षण अनुभवू शकता. प्रकाशचित्रीकरण करताना यांपैकी एखाद्या क्षणाचे प्रकाशचित्र घेऊन आपण इतर घडामोडींचे निरीक्षण करू शकतो. म्हणूनच ‘स्ट्रीट फोटोग्राफी’ची आवड असणाऱ्यांचे ‘डोळे हे नेहमी कॅमेऱ्याच्या शटरसारखे आणि मन हे लेन्स’सारखे असले पाहिजे.


रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे जॉयदीप मुखर्जी, कोलकता

बहुतेक वेळेला लोकांना मी जुन्या काळाचा विचार करणारा (आउट डेटेड) वाटू शकतो, तरी देखील मी स्ट्रीट फोटोग्राफीचा प्रचंड चाहता आहे. हेन्री कारटीअर-ब्रेसोन (Henri Cartier-Bresson), रघू राय, स्टीव मक्राय(Steve McCray), एड काशी (ED Kashi), James Nachtwey, सबस्तिओ सालगाडो (Sebastiao Salgado), जॉन स्टमीअर (John Stammeyer) यांसारख्या दिग्गजांच्या कामाच्या शैलीचा मी अभ्यास करतो आणि त्यातून काही ना काही शिकायचा प्रयत्न करत असतो.

प्रकाशचित्रणातील नियम तोडणे हे नेहमीच मला आकर्षित करते. परंतु मला असे वाटते, की चांगले प्रकाशचित्र मिळवण्यासाठी प्रकाशचित्रणातील मूलभूत गोष्टींवर तुम्ही नेहमीच ठाम असले पाहिजे. हे काही मूलभूत नियम आहेत, जे रस्त्यावरील प्रकाशचित्रण करताना मी पाळतो. रस्ते आणि त्याच्या कार्यक्षेत्रात असणारी माणसे यांचे प्रकाशचित्रण करू इच्छिणार्यांसाठी ते महत्वाचे आहेत.

कॅन्डीड प्रकाशचित्रण:
एखाद्या व्यक्तीच्या नकळत केलेले प्रकाशचित्रण म्हणजे कॅन्डीड प्रकाशचित्रण असे आपण म्हणू शकतो. त्या व्यक्तीच्या समोर कॅमेरा आला, तर प्रकाशचित्रण करताना खोटे हसणे किंवा एक प्रकरचे अवघडलेपण येण्याची शक्यता असते. कॅन्डीड प्रकाशचित्रणामुळे हे टाळता येऊ शकते. तसेच कॅन्डीड प्रकाशचित्रणामुळे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील घटना आपण भावनांसह दाखवू शकतो.


रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे जॉयदीप मुखर्जी, कोलकता

समरस होऊन प्रकाशचित्रण:
सुंदर प्रकाशचित्र मिळवण्यासाठी प्रथम त्या व्यक्तीचा अवघडलेपणा दूर होणे आवश्यक आहे. तिच्याबरोबर संवाद साधणे, गप्पा मारणे, खेळणे यातून ते शक्य होऊ शकते. लहान मुलांचे प्रकाशचित्रण करताना त्यांच्या बरोबर आपण समरस झालो तर आपणांस सुंदर प्रकाशचित्रे मिळू शकतात. त्यांचाबरोबर संवाद साधताना, खेळताना आपण त्याच्या ओळखीचे झाल्यामुळे ती मुले हसतील, खिदळतील. हे सर्व घडत असतानाच तुम्हाला अस्सल आनंदाचे क्षण टिपता येतील. हाच नियम वृद्ध लोकांचे प्रकाशचित्रण करताना लागू होतो. त्यांना हसवा, त्यांच्या मनातील कॅमेऱ्याची भीती दूर करा आणि पहा, तुम्हाला कसे खरेखुरे हावभाव असलेली प्रकाशचित्रे मिळतात ते.


रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे जॉयदीप मुखर्जी, कोलकता

रंगांची छटा चांगली असू शकते
स्टुडिओ प्रकाशचित्रकारांना त्यांच्या प्रकाश या विषयासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लॅश उपकरणांसाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. निसर्गात हे सर्व आपल्यासाठी सहज उपलब्ध असते. बाहेर प्रकाशचित्रण करत असताना ढगाळ वातावरणात किंवा थोड्या सावलीत प्रकाशचित्रणाला साजेसा प्रकाश सहज मिळू शकतो.


रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे जॉयदीप मुखर्जी, कोलकता

पार्श्वभूमी हा देखील विषय होऊ शकतो:
ज्या पार्श्वभूमीवर व्यक्ती उभी आहे किंवा काम करीत आहे ती पार्श्वभूमी देखील प्रकाशचित्राला एक वेगळे परिमाण देऊ शकते. जर आपण एखाद्या भिन्न संस्कृतीचे प्रकाशचित्रण करत असू, तर त्याच्या आजूबाजूचे वातावरण प्रकाशचित्रात दाखवण्याचा प्रयत्न करा. रस्त्यावरील प्रकाशचित्रण करताना अजून काही गोष्टी लक्षात असू द्या - परिपूर्णतेचा आग्रह धरू नका, लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित होईल असे वागू नका, जेणेकरून आपल्या विषयाचे लक्ष विचलित होईल. प्रकाशचित्रणानंतरच्या प्रोसेसिंगची काळजी तेव्हा करू नका, विषय ठळकपणे कसा दर्शवता येईल हे बघा. जर विषय चांगला असेल आणि तो एखादी घटना दर्शवत असेल तर प्रोसेसिंगमुळे फारसा फरक पडत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहमी अधिकाधिक प्रयत्न करा.

रस्ते/माणसे यांच्या प्रकाशचित्रिकरणाची ज्यांना आवड असेल त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, की कधीही बाहेर रस्त्यावर फिरताना आपल्या जवळ कॅमरा असणे आवश्यक आहे. तसेच जे प्रकाशचित्र टिपायचे आहे, त्याच्या रचनेसंबंधीत त्वरित निर्णय घेण्याची तयारी ठेवावी. अन्यथा एखादी रचना/गोष्ट/कॅन्डीड प्रकाशचित्र यांची संधी गमवण्याची शक्यता असते.

काही प्रकाशचित्रकारांना रस्त्यावरील एखादी सामूहिक घटना, चळवळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे प्रकाशचित्रिकरण करणे आवडते. त्यांना मी सांगू इच्छितो - एक कॅमेरा तसेच एक लेन्स जवळ बाळगा, जेणेकरून तुमची प्रकाशचित्रणाची संधी चुकणार नाही.


रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे जॉयदीप मुखर्जी, कोलकता

घटकांचे आणि रंगांचे संतुलन
इथे असणाऱ्या एका प्रकाशचित्रांपैकी एका प्रकाशचित्रात मी रस्त्यावर रंगीबेरंगी छत्री घेऊन उभा असणारा मनुष्य दाखवला आहे. तसेच पावसाळी वातावरणातील रंगीबेरंगी रस्त्याचे वातावरण दाखविले आहे.


रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे जॉयदीप मुखर्जी, कोलकता

प्रकाशाचा योग्य वापर:
हे सावलीचा खेळ दाखविणारे दुसरे प्रकाशचित्र शिमला मॉल येथील आहे. या सावल्या प्रकाशाचा योग्य वापर केल्याचे दर्शवतात.


रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे जॉयदीप मुखर्जी, कोलकता

केंद्रस्थान:
पूर आलेल्या रस्त्यावर असणारी ही महिला हे प्रकाशचित्र पर्यावरणाचा विषय केंद्रस्थानी ठेवून काढलेले आहे हे दर्शविते.

दृष्टीकोन, जागेची विभागणी, हालचाल, लय:
रिफ्रेश युवरसेल्फ आणि द मस्क मॅन ही उदाहरणे आहेत योग्य दृष्टीकोन, जागेचे योग्य विभागीकरण आणि योग्य लय यांची.


रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे जॉयदीप मुखर्जी, कोलकता

रेषेची दिशा:
‘द फोर्ट ऑफ राजस्थान’ या प्रकाशचित्रातील वरून खाली येणारा माणूस - या फोटोमध्ये असणारी रस्त्याची रेष तो माणूस वरून खाली शहराकडे जात असल्याचे सुचवते.


रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे जॉयदीप मुखर्जी, कोलकता

सकारात्मक/नकारात्मक विषय, सृजनशीलता:
Stop, रस्त्यावर नृत्य करणाऱ्या दोन तरूण स्त्रिया, Women are with Fire pots ही उदाहरणे आहेत सकारात्मक आणि नकारात्मक विषयाची. रोज आपण रस्त्यावर नवीन, सृजनशील अशा घटना आणि विषय पाहू शकतो आणि त्यांचे प्रकाशचित्रण करू शकतो.

विविधता, वेगळी गोष्ट, हावभाव मिळवण्यासाठी आपण नेहमीच प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. प्रकाशचित्रण हे टी-२० सामन्यासारखे नसून कसोटी-क्रिकेटसारखे आहे. इथे स्वतःमध्ये सुधारणा करण्यास वेळ लागतो. प्रत्येक चुकांतून आपण काहीतरी शिकत असतो. ‘मॅग्नम’सारख्या वेबसाईटवरून अभ्यास करून, मोठ्या प्रकाशचित्रकारांचे काम पाहून, समजून आपण आपले प्रकाशचित्रण अधिकाधिक चांगले करू शकतो.


रस्ते आणि तिथे कार्यरत असणारी माणसे जॉयदीप मुखर्जी, कोलकता


To Read in English मागील लेख पुढील लेख